दि.०२/०८/२०२३ रोजी भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन कडील अधिकारी व अंमलदार हे भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन हद्दीत पेट्रोलींग करीत असताना महाराणा प्रताप चौक भारती विद्यापीठ, पुणे येथील एच.डी.एफ.सी. बँकेचे ए.टी.एम मशीनजवळ दोन संशयीत इसम मिळुन आल्याने त्यांचेकडे विचारणा करता त्यांनी त्यांचे नावे १) धर्मेन्द्र श्रीशिवलाल सरोज, वय ३० वर्ष, रा. गाव मशेरा तहसिल कुंडा, जि. प्रतापगड, राज्य उत्तरप्रदेश, २) सोनुकुमार जगदेव सरोज, वय २८ वर्ष, रा. गाव बदगावा, तहसील कुंडा जि. प्रतापगड, राज्य उत्तरप्रदेश अशी असल्याचे सांगितले.
सदर इसमांकडे केलेल्या तपासामध्ये वर नमुद आरोपीत हे महाराणा प्रताप चौक भारती विद्यापीठ, पुणे येथील एच.डी.एफ.सी. बॅकेचे ए.टी.एम मशीन टेंम्परींग करुन त्यावर पट्टी लावुन ग्राहकांचे पैसे काढत असल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यावरुन त्यांचेविरुद्ध भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन गुन्हा रजि नंबर ५०५/२०२३, भादंवि कलम ४२०, ४२७ ३४ अन्वये गुन्हा दाखल करुन त्यांना नमुद गुन्हयामध्ये अटक केली आहे. तसेच आरोपीतांकडुन ६०००/- रुपये रोख रक्कम, टेंम्परींग करण्यासाठी वापरलेली पट्टी, मोबाईल फोन असा एकुण १५०००/ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. तसेच आरोपीतांनी पुणे शहरातील विविध ठिकाणावरील ए.टी.एम मशीन टॅम्परिंग करुन पैसे काढले असल्याची कबुली दिली असुन त्याबाबतची गुन्हयाची माहीती घेण्याचे कामकाज चालु आहे.
सदरची कारवाई मा. अपर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशीक विभाग, पुणे, श्री. प्रविणकुमार पाटील, मा. पोलीस उप आयुक्त परिमंडळ २ श्रीमती स्मार्तना पाटील मा. सहाय्यक पोलीस आयुक्त स्वारगेट विभाग, पुणे श्री. नारायण शिरगावकर यांचे मार्गदर्शनाखाली भारती विदयापीठ पोलीस स्टेशनकडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. विजय कुंभार, पोलीस निरीक्षक (गुन्हे) श्री. विजय पुराणिक श्री गिरीशकुमार दिघावकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल रसाळ, पोलीस अंमलदार दिनेश वीर, योगेश घोडके, धुमाळ, सचिन सरपाले, नरेंद्र महांगरे, चेतन गोरे, अभिनय चौधरी, शैलेश साठे, निलेश ढमढेरे, मंगेश पवार, हर्षल शिंदे, अभिजीत जाधव, अवधुत जमदाडे, धनाजी धोत्रे, सचिन गाडे, निलेश खैरमोडे, मितेश चोरमोले, अशिष गायकवाड, राहुल तांबे, विक्रम सावंत यांच्या पथकाने केली आहे.
0 Comments