कोंढवा पोलीस स्टेशन या ठिकाणी ७९३ / २०२३ भादविक ३०२ प्रमाणे खुनाचा गुन्हा दाखल आहे. दाखल गुन्ह्यातील मयत अनंत शंकरराव काळगीरे वय ४५ वर्षे रा. हनुमाननगर पिसोळी पुणे व त्यांचा भाचा सचिन राम येनलवाड रा. सदर यांनी सोबत मजुरीचे काम केले होते, त्यावेळी सदर कामाचे पैसे सचिन याने त्याचा मामा अनंत याच्याकडे मागीतले होते तेव्हा मामाने मजुरीचे पैसे देण्यास नकार दिला असता भाच्याने दारू पिडुन मामाच्या डोक्यात रॉडने मारून त्यास गंभीर जखमी करून नांदेड या ठिकाणी पळुन गेला होता. जखमी यांचा उपचारा दरम्यान ससुन हॉस्पीटल या ठिकाणी मयत झाली आहे. सदर आरोपीचा शोध घेण्याबाबत वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष सोनवणे यांनी आदेशीत केले होते. आदेशाप्रमाणे कोंढवा तपास पथकाचे पोलीस उपनिरीक्षक स्वप्नील पाटील व पोलीस अंमलदार पोहवा / ११६१ सतिश चव्हाण, पोहवा / ७९ निलेश देसाई, पोना / ८४८६ गोरखनाथ चिनके, पोना / ७७८२ जोतिबा पवार, पो. अं. / २१८५ सुजित मदन, पो.अं. / ९८३८ संतोष बनसुडे, पो.अं./८५९१ लक्ष्मण होळकर, पो. अं./१०११६ सागर भोसले व पो. अं. / ४९० सुरज शुक्ला, पो. अं अनिल बनकर असे आरोपीचा गुप्त माहिती काढुन शोध घेत होतो सदर आरोपी हा ता. देगलुर जिल्हा. नांदेड येथे पळुन गेला असल्या बाबतची माहिती पोहवा / ११६१ सतिश चव्हाण, पो.अं./९८३८ संतोष बनसुडे,
पो. अं. / ८५९१ लक्ष्मण होळकर यांना प्राप्त झाली प्राप्त माहितीच्या अनुषगांने तात्काळ वरील स्टाफ ता. देगलुर जिल्हा. नांदेड येथे रवाना होउन स्थानीक पोलीसांची मदत घेवून आरोपी याचा शोध घेवुन आरोपी हा त्याच्या शेतात लपुन बसला असताना त्यास पकडुन जेरबंद करण्यात आले आहे. सदर आरोपी याच्याकडे तपास केला असता त्याने त्याचा मामा अनंत शंकरराव काळगीरे वय ४५ वर्षे रा. हनुमाननगर पिसोळी पुणे व भाचा सचिन राम येनलवाड रा. सदर यांनी सोबत मजुरीचे काम केले होते, त्यावेळी सदर मजुरीचे अर्धे पैसे सचिन याने त्याचा मामा अनंत याच्याकडे मागीतले असता मामाने मजुरीचे पैसे देण्यास नकार दिल्याने रागाच्याभरात दारू पिडुन डोक्यात रॉडने मारून त्यास गंभीर जखमी केल्याची कबुली दिली आहे. दाखल गुन्ह्याचा तपास सहा पोलीस निरीक्षक विकास बाबर हे करीत आहेत.
वरील नमुद कारवाई ही मा. पोलीस उप-आयुक्त, परिमंडळ-५ श्री विक्रांत देशमुख. मा. सहा. पोलीस आयुक्त वानवडी विभाग श्री शाहुराज साळवे, मा. वरिष्ठ पोलीस निरीक्षक साो. श्री " संतोष सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली कोंढवा पोलीस स्टेशन येथील तपास पथकाचे पोलीस उपनिरीक्षक स्वप्नील पाटील, पोहवा / ११६१ सतिश चव्हाण, पोहवा / ७९ निलेश देसाई, पोना / ८४८६ गोरखनाथ चिनके, पोना / ७७८२ जोतिबा पवार, पो. अं./२१८५ सुजित मदन, पो. अं./९८३८ संतोष बनसुडे. पो.अं./८५९१ लक्ष्मण होळकर, पो. अं./ १०११६ सागर भोसले व पो. अं. / ४९० सुरज शुक्ला, पो. अं अनिल बनकर यांच्या पथकाने केली आहे.
0 Comments