आज दिनांक 03/08/2023 रोजी कोंढवा पोलीस स्टेशन हद्दीत कौसर बाग सोसायटी ग्राउंड या ठिकाणी कौसरबा को-ऑपरेटिव्ह सोसायटी तर्फे बैठक आयोजित करण्यात आली होती. सदर बैठकीत कौसर बाग भागातील नागरिकांनी सोसायटीतील फ्लॅट तसेच दुकानातील भाडेकरू करार व वेरिफिकेशन करणे गरजेचे आहे व ते आपल्यासाठी किती महत्त्वाचे आहे. याबाबत मार्गदर्शन केले व त्यांचे इतर समस्या जाणून घेऊन त्यांचे मार्गदर्शन करण्यात आले. तसेच कौसर बाग को-ऑपरेटिव्ह सोसायटी तसेच इतर सोसायटीमध्ये येणारे फेरीवाले किंवा नवीन कोणीही माणूस आला तर त्याची पूर्ण चौकशी सोसायटीच्या चेअरमन व सोसायटी धारक यांनी करावी त्याच पद्धतीने प्रत्येक सोसायटीमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे लावून घ्यावेत सोसायटीमध्ये वॉचमन नवीन येणाऱ्या जाणाऱ्या गाड्यांची तसेच लोकांची पूर्ण माहिती ही रजिस्टर मध्ये नोंद करावी.
सदर बैठकीत, पोलीस निरीक्षक मोगले साहेब, पोलीस उपनिरीक्षक श्री सोनवणे साहेब, गोपनीय स्टाफ व नारायण लोणकर, सलीम शेख, देवदास लोणकर, बाबा शेख, अन्वर रंगरेज, मोबीन खान, शाहिद खान व सोसायटीतील एकूण 70 ते 80 लोकांचा जनसमुदाय उपस्थित होता. सदर बैठक सायंकाळी 20/00 वाजता सुरू होऊन 20/50 वाजता शांततेत पार पडली.
(संतोष सोनवणे)
वरिष्ठ पोलीस निरीक्षक
कोंढवा पोलीस स्टेशन पुणे शहर
0 Comments