शहापूर जवळ समृद्धी महामार्गचे सुरु असलेल्या कामात क्रेन कोसळून १७ जणांचा मृत्यू तर 3 जखमी.

ठाणे, शहापूर  :  दिनांक ०१/०८/२०२३ रोजी ०१ : ०७ वाजताच्या सुमारास ठाणे जिल्हा प्रादेशिक आपत्ती व्यवस्थापन कक्षाकडे प्राप्त झालेल्या घटनेच्या माहितीनुसार सातगाव पुल, सरळ आंबेगाव, शहापूर, ठाणे. या ठिकाणी समृद्धी महामार्गावरील ब्रीजचे काम सुरू असताना महामार्गावरील क्रेन तेथील काम करणाऱ्या कामगारांच्या अंगावर पडून अपघात झाला आहे, अशी माहिती समोर येत आहे, सदर घटनास्थळी स्थानिक कामगार, पोलीस कर्मचारी, अग्निशमन दलाचे जवान उपस्थित असून बचाव कार्य युद्धपातळीवरती सुरू आहे.१७ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे

सदर क्रेन घटनास्थळी काम करत असलेल्या कामगारांच्या अंगावर पडल्यामुळे काही कामगार क्रेन खाली अडकले आहेत. सदर घटनेत १७ व्यक्तीचा मृत्यू झाला असून, ०३ व्यक्ती जखमी असून जखमींना जवळील रुग्णालयात उपचाराकरिता दाखल केले आहे.

Post a Comment

0 Comments