बहुजन समाज पार्टी युवक आघाडी पुणे शहर. संंभाजी भिडे याने राष्ट्रपिता महात्मा फुले यांच्यावर केलेल्या वक्तव्यामुळे , बहुजन समाज पार्टी यांच्या वतीने कायदेशीर पुन्हा दाखल करण्यात यावा, खडक पोलीस स्टेशन यांना निवेदन देण्यात आले
मनोहर कुलकर्णी उर्फ संंभाजी भिडे याने राष्ट्रपिता महात्मा फुले यांच्यावर केलेल्या वक्तव्यामुळे भिडेवर भा.द.वि.कलम 295A आणि 298 प्रमाणे गुन्हा दाखल करावा यासाठी बहुजन समाज पार्टी युवक आघाडी पुणे शहर वतीने खडक पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पो.नि.सुनिल माने साहेबांना निवेदन देण्यात आले.यावेळी बहुजन समाज पार्टीचे कायदेशीर सल्लागार ॲड अतुल सोनवणे, युवा अध्यक्ष पुणे शहर सिद्धार्थ कांबळे, महासचिव शुभम तेलंग, उपाध्यक्ष विक्रम शेलार, नदिम शेख, सचिव अजिंक्य गायकवाड, जय गायकवाड, मुस्तफा शेख, अनुप दोडके, रोहित चव्हाण कार्यकर्ते उपस्थित होते.
0 Comments