पुण्यात नगर रस्त्यावर बीआरटी मार्गवर बसची समोरासमोर धडकेत दोन्ही बसमधील 29 प्रवासी गंभीर जखमी.

घटनास्थळी पोलीस-अग्निशमन दल, रुग्णवाहिकेसह पीएमपीएल-बीआरटीचे अधिकारी दाखल झाले 
पुणे नगर रस्त्यावर चंदननगर येथील बीआरटी बसची समोरासमोर धडक होऊन अपघात झाल्याची घटना, घडली आहे ,
या अपघातात,29 प्रवासी जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे. घटनास्थळी पोलीस, अग्निशमन दल तसेच पीएमपीएल व बीआरटी चे अधिकारी दाखल झालेले आहेत. 
पुण्यात आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अनेक व्हीआयपी आज पुण्यात आहेत,
या पार्श्वभूमीवर मोठा पोलीस बंदोबस्त एअरपोर्ट,नगररस्ता तसेच संपूर्ण शहरात नेमण्यात आलेला आहे. 
अचानक झालेल्या या अपघातामुळे नगर रस्ता परिसरात काही वेळ वाहतूक कोंडी झाली होती. 
जखमींना उपचारासाठी नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्याचे काम सुरू असून अपघाताचे कारण मात्र अद्याप समजू शकलेले नाही.

Post a Comment

0 Comments