०१) घरफोडी-: दि. २३/०७/२०२३ रोजी रात्री ०३.०० वा.चे सुमारास फलॅट नं. १०६, बाघजाई माता अपार्टमेंट फेज-२, गुजर-निंबाळकरवाडी, कात्रज पुणे येथून कोणीतरी अज्ञात चोरटयाने फिर्यादी, यांचे राहते घर फलॅट नं. १०६, वाघजाई माता अपार्टमेंट फेज-२, गुजर-निंबाळकरवाडी, कात्रज पुणे या फलॅटचा कडी कोयंडा तोडून आत प्रवेश करून सोन्याचे, चांदीचे व हिन्याचे दागिने असा एकूण ११,२८,१६०/- रू. कि.चा येणेप्रमाणे वरील वर्णनाचा माल चोरून नेला आहे म्हणुन भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन गुन्हा रजि नंबर ४८७/२०२२, भा.द.वि. कलम ४५७,३८० अन्वये गुन्हा दाखल आहे.
सदर दाखल गुन्हयाच्या तपासामध्ये भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन गुन्हे शोध पथक हे वरिष्ठाच्या मार्गदर्शनाखाली तपास करीत असताना घटनास्थळाचा तांत्रीक विश्लेषण करून तसेच घटनास्थळापासून ठिकठिकाणच्या २७ कॅमेराची पाहणी करुन सदर गुन्हयाचा कसून तपास करीत असताना पोलीस अमलदार धनाजी धोत्रे, हर्षल शिंदे, सचीन गाडे यांना गुप्त बातमीदारामार्फत सदर गुन्हयामध्ये गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या विधीसंघर्षग्रस्त बालकाचा सहभाग असल्याचे तपासात निष्पन्न झाले परंतु सदर विधीसंघर्षग्रस्त बालके ही फिरस्ते असून त्यांचा पालक देखील नसल्याने व त्यांचा राहण्याचा कोणताही ठावठिकाणा नसल्याने त्यांचे शोध लागत नव्हता व ते कोणताही मोबाईल देखील वापरत नसल्याने तांत्रीक दुष्टया शोध होत नव्हता स्यांनंतर दि.३०/०७/२०२२ रोजी त्यातील एक विधीसंघर्षग्रस्त बालक हा त्याचे मैत्रीणीला भेटण्यास कात्रज तलाव येथे येणार असल्याबाबत गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली असता सदर ठिकाणाहून त्यांना ताब्यात घेतले असता त्यांचेकडून गुन्हयातील गेला माल
१)४३ ग्रॅम वजनाचे सोन्याचे पुर्ण पट्टी मंगळसूत्र व त्यास पेंडल असलेले (२)७५ ग्रॅम वजनाच्या किंमतीच्या चार सोन्याच्या बांगडया
३)०१ ग्रॅम वजनाचा सोनाचा कॉईन.
४) ०२ ग्रॅम वजनाची सोन्याची नथ
(५) १५ ग्रॅम वजनाचे सोन्याचे कडे
६) ६० ग्रॅम वजनाचे सोन्याचे नेकलेस सेट
७) ०५ ग्रॅम वजनाचे सोन्याचे कानातील दागिने
८) ०४ ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी
९)१० ग्रॅम वजनाची हिरेसह सोन्याचे मंगळसूत्र
१०) ०७ ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी
११) ७० ग्रॅम वजनाचे चांदीचे पैजन
१२) ०२ पासपोर्ट
असा एकूण २२ तोळे वजनाचे सोन्याचे दागिने हि-यासह व चांदीचे पैजन असे १२,३१,०००/- रु किमंतीचा (सध्याच्या बाजारभावानुसारचा) मुददेमाल दोन पासपोर्टसह हस्तगत करण्यात आला आहे.
0 Comments