दिनांक २०/०७/२०२३ रोजी रात्री १२.१५ वा. ते १२.३० वा चे दरम्यान कात्रज चौक, जे.एस.पी.एम समोरील बस स्टॉपवरुन फिर्यादी हे रिक्षाने आंबेगाव बु. पुणे येथे राहते घरी जात असताना रिक्षामधील दोन इसमांनी फिर्यादी हाताने मारहाण करुन त्यांचे गळ्यातील सोन्याची चैन, हातातील अंगठी, व खिशातील रोख रक्कम, तसेच रिक्षा चालकाने फिर्यादी यांचा लॅपटॉप, चार्जर, माऊस असलेली बॅग असा एकुण १,६८,३४०/- रुपयांचा माल जबरदस्तीने चोरी करुन रिक्षामधुन हायवेवरील राजवीर प्युअर व्हेज या हॉटेल समोरील रोडवर ढकलून देवून पळून गेले आहेत म्हणुन फिर्यादी यांनी तक्रार दिल्याने भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन, पुणे शहर गुन्हा रजि नंबर ४९४/२०२३, भादंवि कलम ३९२, ३२३, ५०४, ५०६, ३४ अन्वये गुन्हा दाखल आहे.
दाखल गुन्हयातील अज्ञात आरोपीतांचा भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनचे तपास पथकाचे अधिकारी च अंमलदार शोध घेत असताना अमलदार अवधूत जमदाडे, चेतन गोरे, निलेश ढमढेरे यांना गुप्त बातमीदारामार्फत आरोपीची माहिती मिळाली असता ०१) सुदर्शन शिवाजी कांबळे, वय २२ वर्षे रा वारजे म्हाडा कॉलनी, पुणे ०२) ओम सुरेश ढेबे वय १८ वर्षे, रा चैतन्यनगर धनकवडी पुणे यांस ताब्यात घेतले असता त्यांनी गुन्हयाची कबुली दिली त्याचेकडून दोन जबरीचे चोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत. ०१) भारती विद्यापीठ पो स्टे गुरनं ४९४/२०२३, भादंवि कलम ३९२, ३२३, ५०४, ५०६, ३४
०२) भारती विद्यापीठ पो स्टे गुरनं ४९९/२०२३, भादंवि कलम ३९२, ५०४, ५०६ (२), ३४ त्यामध्ये ०१) ७०, ५००/- रु किमंतीचा लॅपटॉप
(०२) ६०,०००/ रु किमतीची १० ग्रॅम वजनाची सोन्याची चैन
०३) ३५,०००/- रु किमतीची ०५ ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी ०४) ४०,०००/- रु किमतीची ०६ ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी.
०५) २५००/- रु एसएसडी
०६) २०००/- रु किमंतीची टायटन कंपनीचे घडयाळ
०७) ०१,००,०००/- रु किमतीची गुन्हयात वापरलेले रिक्षा
असा एकूण २१ तोळे वजनाचे सोन्याचे दागिने, लॅपटॉप, घडयाळ, एसएसडी असा एकूण ०३, १२,०००/- रु किमतीचा मुददेमाल जप्त करण्यात आला आहे.
तरी, भारती विदयापीठ पोलीस स्टेशनने गंभीर घरफोडी व दोन जबरी चोरीचे गुन्हे उघडकीस आणून सदर वेगवेगळ्या गुन्हयामध्ये एकूण २४.१ तोळे वजनाचे सोन्याचे दागिने हि-यासह, ७० ग्रॅम. वजनाची चांदी व इतर असा एकूण १५,४३,०००/- रु किमतीचा मुददेमाल आरोपी व विधीसंघर्षग्रस्त बालकाकडून हस्तगत करण्यात आला आहे.
सदरची कामगिरी मा. रितेशकुमार, पोलीस आयुक्त, पुणे शहर, मा.संदीप कर्णिक, सह आयुक्त, पुणे शहर, मा. प्रविणकुमार पाटील, अपर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशीक विभाग, पुणे, मा. श्रीमती स्मार्तना पाटील सो मा. पोलीस उप आयुक्त परिमंडळ २, मा. नारायण शिरगावकर सारे, मा. सहाय्यक पोलीस आयुक्त स्वारगेट विभाग, पुणे यांचे मार्गदर्शनाखाली भारती विदयापीठ पोलीस स्टेशनकडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री विजय कुंभार, तसेच पोलीस निरीक्षक (गुन्हे) विजय पुराणिक, गिरीश दिघावकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल रसाळ, सहा.पो निरीक्षक, वैभव गायकवाड, पोलीस उपनिरीक्षक धिरज गुप्ता पोलीस अंमलदार हर्षल शिंदे धनाजी धोत्रे, सचिन गाडे, अवधतु जमदाडे, चेतन गोरे, निलेश ढमढेरे, सचिन सरपाले, नरेंद्र महांगरे, आशिष गायकवाड, मंगेश पवार निलेश खैरमोडे, अभिनय चौधरी, शैलेश साठे, अभिजीत जाधव, महेश बारावकर, राहुल तांबे, विक्रम सावंत, यांच्या पथकाने केली आहे.
0 Comments