जबरी चोरी करणाऱ्या गुन्हेगारास २४ तासाच्या आत बिबवेवाडी पोलीसांनी केले अटक


सदरबाबत अधिक माहिती अशी की, दिनांक २६/०७/२०२३ रोजी सायंकाळी ०५.०० वा. चे सुमारास फिर्यादी व त्यांचा मित्र असे इतर मित्रांना क्लासला बोलविण्यासाठी जात असताना ते दुर्गामाता गार्डन समोर सुपर बिबवेवाडी पुणे येथे आले असता तेथे एक अनोळखी इसमाने त्यांना जवळ बोलावून ओला बुक करण्याचा बहाणा करून फिर्यादी व त्यांचा मित्र या दोघांचे हातातील मोबाईल जबरदस्तीने हिसका मारून चोरून पळून गेला म्हणून त्याचेविरुध्द फिर्यादी यांनी तक्रार दिलेने भा.दं.वि.सं.कलम ३९२ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

दाखल गुन्हयातील अनोळखी आरोपीचा वरिष्ठ पोलीस निरीक्षक सविता ढमढेरे यांचे मार्गदर्शनाखाली तपासपथक प्रमुख सहा. पोलीस निरीक्षक प्रविण काळुखे, पोलीस उप निरीक्षक संजय आदलिंग, तपास पथकातील अमलदार यांनी गुन्हयाचे घटनाठिकाणापासून ते आरोपी गेलेल्या मार्गावरील सीसीटीव्ही कॅमेरे चेक करून पोलीस अमलदार प्रणव पाटील व शिवाजी येवले यांना मिळालेल्या बातमीवरून आरोपी नामे मनोज मोहन वानखेडे, वय २० वर्षे रा. धायरेश्वर मंदिराजवळ, गोकुळनगर चौक, धायरी पुणे. मुळ माजलगांव, ता. माजलगांव, जि. बीड यास ताब्यात घेवून गुन्हयात अटक करण्यात आली असून त्याचेकडून तपासामध्ये फिर्यादी यांचा एक वियो कंपनीचा मोबाईल व साक्षीदार यांचा एक रेडमी कंपनीचा मोबाईल कि.रु. २०,०००/- चे हे जप्त करण्यात आलेले आहेत. दाखल गुन्हयाचा पुढील तपास सहा. पोलीस निरीक्षक प्रविण काळुखे हे करीत आहेत.

सदरची कारवाई ही मा. पोलीस आयुक्त पुणे शहर श्री रितेश कुमार, मा. सह पोलीस आयुक्त पुणे शहर श्री संदिप कर्णिक, मा. अपर पोलीस आयुक्त श्री रंजनकुमार शर्मा, पूर्व प्रादेशिक विभाग पुणे शहर, परिमंडळ ०५ चे पोलीस उपायुक्त मा. विक्रांत देशमुख, वानवडी विभागाचे सहा. पोलीस आयुक्त मा. शाहूराजे साळवे, बिबवेवाडी पोलीस ठाणे चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीमती सविता ढमढेरे, पोलीस निरीक्षक गुन्हे संजय पतंगे यांचे मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे प्रभारी अधिकारी सहा. पोलीस निरीक्षक प्रविण काळुखे, पोलीस उप निरीक्षक श्री संजय आदलिंग, पोलीस अमलदार संतोष जाधव, प्रणय पाटील, शिवाजी येवले, ज्योतिष काळे, अभिषेक धुमाळ, सतिष मोरे व तानाजी सागर यांनी केली आहे.

Post a Comment

0 Comments