नजर हटली, दुर्घटना घडली - आई- वडिलांनी सतर्क राहणे गरजचे

नाशिक येथील एका कुटुंबातील वडील कामा वर व आई काही कामासाठी‎ शेजारी गेली असताना निखिल आणि‎ त्याचा भाऊ झोका खेळत होते. झोका गोल-फिरवला‎ आणि झोक्याची ‎दोरी त्याच्या मानेलाच आवळली गेली. आणी त्याला जीव गमवावा लागला. 
ही घटना ताजी असतानाच आणखी एक दुर्देवी घटना महेबुबनगर, तेलंगणा येथुन येत आहे. आई वडील कामा मधे व्यस्त असताना सोसायाटी च्या पार्किंग मध्ये असलेल्या पाण्याच्या टाकी मधे पडून जीव गमावला. मेहबूबनगर येथील अंडर कन्स्ट्रक्शन असलेल्या सोसायटी मधे पाणी स्टोअर करण्या साठी पार्किंग टाकी बांधण्यात आली होती. पावसाचे पाणी निचरा होण्या साठी पाण्याच्या टाकी चे झाकण उगडे ठेवले होते. लहान मुलगा आकाश/लड्डू  वेपुर , वय ९ वर्ष हा खेळत खेळत पाण्याच्या टाकीत पडून दुर्देवी मृत्यू झाला. हल्लीच्या पालकांनी सतत आपल्या मुलांवर लक्ष ठेवणे खूप आवश्यक झाले आहे.
सोसायटी बिल्डर निष्काळजी पणामुळे एका निष्पाप मुलाला आपला जीव गमवावा लागला. सबंधित बिल्डर वर श्रीनिवास नगर रुरल पोलिस स्टेशन मध्ये गुन्हा नोंदविण्यात आला आहे. अश्या गैरजबादार बिल्डर वर तातकाळ कारवाई करण्यात यावे.

Post a Comment

0 Comments