अंजलीताई आंबेडकर :मणिपूर जळत असताना परदेशी दौरे करण्यात मग्न असलेल्या पंतप्रधानांनी राजीनामा द्यावा.
पुणे : आज वंचित बहूजन आघाडी पुणे शहराच्या वतीने मणिपूर हिंसाचाराचा निषेध करण्यात आला त्या वेळी वंचित बहुजन आघाडीच्या नेत्या प्राध्यापिका अंजलीताई आंबेडकर यांनी भाजप व आर एस एस वर सडकून टीका केली.
दलित आदिवासी समाजावर मणिपूर मध्य अत्याचार होत असताना देशाचे सेवक म्हणून घेणारे पंतप्रधान हे आपल्या देशाची संपत्ती ही वेग वेगळ्या उद्योगपती व वेगवेगळ्या देशातील विद्योगपती यांच्या घशात घालण्यासाठी परदेशी दौरे करीत होते. मणिपूर हिंसाचाराच्या निषेधार्थ पंतप्रधान यांचा राजीनामा मागितला पाहिजे आणि हीच मागणी योग्य आहे असे मत मांडले तसेच वंचित बहुजन आघाडीच्या जिल्हा, तालुका पदाधिकारी यांनी आदिवासी समाजातील लोकांशी संपर्क साधावा व झालेल्या अत्याचाराची माहिती देउन सरकार बद्दल जनजागृती करावी अशी विनंती केली..
या वेळी वंचित बहुजन आघाडी पुणे शहर, महिला आघाडी, युवक आघाडी, माथाडी कामगार व ट्रान्सपोर्ट आघाडी पदाधिकारी कार्यकर्ते तसेच जेष्ठ नेते वसंतदादा साळवे,प्रफुल्ल गुजर, अनिता ताई चव्हाण, विशाल कसबे, परेश सिरसंगे, ॲड अरविंद तायडे, सुनिल धेंडे, दिपक ओव्हाळ, रफिक भाई शेख, अजय भालशंकर, विनोद जाधव, हिरामण वाघमारे, अनिताताई चव्हाण, रेखाताई चौरे, सारिकाताई फडतरे, नवनीत अहिरे, ओंकार कांबळे, शुभम चव्हाण यांच्या
पुणे शहरातील सन्मानिय आजी माजी शहर विधानसभा, प्रभाग पदाधिकारी व कार्यकर्ते मोठय़ा संख्येने उपस्थित होते..
0 Comments