मुंढवा पोलीस ठाणे, पुणे शहर
बी.टी. कवडे रोडवरील किराणा मालाच्या दुकानातील रोख रक्कम चोरणारे, दोघांना अटक.
दि. २२/०७/२०२३ रोजी मुंढवा पोलीस ठाणे हददीत वठारे मळा याठिकाणी असलेल्या फिर्यादी यांचे दुकानातील रोख रक्कम ही फिर्यादी हे दुकानाबाहेर गेले असताना त्यांचे काऊंटर मधुन अज्ञात आरोपींनी चोरुन नेलेबाबत मुंढवा पोलीस ठाणे येथे गुरनं. २४४/२०२३,भादविक ३८०, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल झाला होता..
सदर गुन्हयाचा तपासाचे पुढील आदेश मुंढवा पोलीस ठाणेचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक, श्री विष्णु ताम्हाणे यांनी तपास पथक प्रमुख सहा. पोलीस निरीक्षक, संदीप जोरे व स्टाफ यांनी दिल्याने सदरचा स्टाफ हा चोरी झालेल्या दुकानातील तांत्रिक विश्लेषनाचे माध्यमातुन अज्ञात आरोपीचा तपास करुन अखेर पोलीसांनी १) चंद्रकांत राजु जाधव, वय २४ वर्षे २)राहुल ईश्वर सितापुरे, वय २९ वर्षे दोघे रा, मुंढवा,पुणे यांना वरील गुन्हयात अटक करण्यात आली आहे. त्यांनी गुन्हयाची कबुली दिली असुन, त्यांचे कडुन गुन्हयात चोरलेली रक्कम जप्त करण्यात आली आहे.
सदरची कामगिरी मा. अपर पोलीस आयुक्त, पुर्व प्रादेशीक विभाग, पुणे शहर, श्री. रंजनकुमार शर्मा, मा. पोलीस उप-आयुक्त, परिमंडळ - ५, पुणे शहर, श्री. विक्रांत देशमुख, मा. सहा. पोलीस आयुक्त, हडपसर विभाग, पुणे शहर श्रीमती अश्विनी राख यांचे मार्गदर्शना खाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक, श्री विष्णु ताम्हाणे, पोलीस निरीक्षक (गुन्हे), श्री. प्रदिप काकडे, तपास पथकाचे सहा. पोलीस निरीक्षक, विलास सुतार, संदिप जोरे, पोलीस अंमलदार, दिनेश राणे दिनेश भांदुर्गे, महेश पाठक, वैभव मोरे, राहुल मोरे सचिन पाटील व स्वप्नील रासकर यांनी केली आहे.
0 Comments