गावठी पिस्टल बाळगणा-यास वानवडी पोलीसांनी केले जेरबंद,एकुण १,६०,६४०/- रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत.

वानवडी पोलिस स्टेशन पुणे शहर
गावठी पिस्टल बाळगणा-यास वानवडी पोलीसांनी केले जेरबंद,एकुण १,६०,६४०/- रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत.

दि. २५/०७/२०२३ रोजी २१/३० वा. ते २७/०७/२०२३ रोजी दरम्यान मा. अप्पर पोलीस आयुक्त गुन्हे, पुणे शहर यांचे आदेशान्वये ऑल आऊट / कोंबिंग ऑपरेशन राबविण्यात येत असताना जातीय तेढ निर्माण करणा-या व्यक्ती समाज विघातक कृत्य करणा-या संघटना, व्यक्ती, रेकॉडवरील गुन्हेगार हिस्ट्रिशिटर, हॉटेल, लॉजेस तपासणी करणे, दहशतवादी कृत्याचे अनुषंगाने तपासणी करण्याचे आदेश प्राप्त झाले होते..

त्याप्रमाणे तपास पथकाचे प्रभारी पोलीस अधिकारी पोउपनि संतोष सोनवणे व तपास पथकातील पोलीस अंमलदार, संदिप साळवे, राहुल माने, गोसावी, कदम, नाईक असे वानवडी पोलीस ठाणे हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना, गुप्त बातमीदारमार्फत बातमी मिळाले प्रमाणे रामटेकडी इंडस्ट्रियल एरिया लेन नं. १, आण्णा भाऊसाठे उद्यानामागे रोडलगत एक इसम संशयितरित्या सफेद रंगाचे अॅक्टिवा मोपेड गाडीवर बसुन रिमझिम पावसात विनाकारण थांबलेला असुन तसेच तो कोणतातरी दखलपात्र गुन्हा करण्याचे उद्देशाने वावरत असल्याचे व त्यांचेकडे अग्निशस्त्र असण्याची दाट शक्यता असलेबाबत गुप्त बातमीदाराव्दारे माहिती मिळाल्याने, सदरबाबत वरिष्ठ पोलीस निरीक्षक, श्री . भाउसाहेब पठारे यांना कळविली असता, त्यांनी कारवाई करणेबाबत सुचना देवून, सुचनांप्रमाणे वर नमूद स्टाफ यांनी सापळा रचून घेराव घालुन छापा कारवाई करून त्या इसमास ताब्यात घेतले असता, त्याचेकडे वानवडी पोलीस ठाणे हददीत संशयास्पदरिता वावरणेचे कारणा बाबत तपास केला असता, त्याचेकडे गावठी पिस्टल मिळून आल्याने जप्त करण्यात आले आहे.

येणे प्रमाणे आरोपीत नामे संतोष जैनाथ शुक्ला, वय ५० वर्षे, रा. भागीरथी नगर, साडे सतरा नळी. हडपसर पुणे मुळ रा. मु.पो. कनेव्हरा, इलाहबाद, उत्तर प्रदेश. याचेकडे एक गावठी पिस्टल व त्याचेकडील दुचाकी वाहनासह एकुण १,६०,६४०/- रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. आरोपीत यांचे विरोधात भारतीय हत्यार कायदा कलम ३ (२५) महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ३७(१) (३) सह १३५ प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

सदर गुन्हयाचा तपास पुढील पोलीस उप-निरीक्षक संतोष सोनवणे तपास पथक, वानवडी पोस्टे हे करत आहेत.

सदरची कारवाई ही मा. अपर पोलीस आयुक्त, पुर्व प्रादेशीक विभाग, पुणे शहर, श्रीरंजनकुमार शर्मा, मा. पोलीस उप आयुक्त, परि-५, पुणे शहर, श्री. विक्रांत देशमुख, मा. सहा. पोलीस आयुक्त वानवडी विभाग पुणे शहर श्री. शाहुराजे साळवे यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरिक्षक, भाऊसाहेब पठारे, पोलीस निरीक्षक (गुन्हे), श्री. विनय पाटणकर, तपास पथकातील पोलीस उपनिरिक्षक, संतोष सोनवणे, पोलीस अंमलदार, हरीदास कदम, अतुल गायकवाड, यतिन भोसले, अमोल गायकवाड, विठठल चोरमले, विष्णु सुतार, निलकंठ राठोड, सोनम भगत यांनी मिळुन केली आहे..

Post a Comment

0 Comments