विमानतळ पोलीसांनी आंतरराज्यीय अट्टल वाहनचोरास केले गजाआड.

विमानतळ पोलीसांनी आंतरराज्यीय अट्टल वाहनचोरास केले गजाआड,२,५५,०००/- रुपये किंमतीच्या एकुण ५ दुचाकी हस्तगत.

श्री. विलास सोंडे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, विमानतळ पोलीस स्टेशन पुणे शहर, यांनी दिलेल्या माहितीनुसार,

विमानतळ पोलीस ठाणेचे हददीत अलीकडील काळामध्ये दुचाकी चोरीच्या घटना वारंवार होत असल्याने पोलीस ठाणेचे प्रभारी अधिकारी श्री विलास सोंडे सो यांनी तपास पथकातील अधिकारी व अंमलदार यांना पोलीस ठाणे हददीत गस्त करुन दुचाकी चोरी करणारे इसमास ताब्यात घेणेबाबतच्या सुचना वेळोवळी दिलेल्या होत्या. दिनांक २५/०७/२०२३ रोजी कोंबिंग ऑपरेशनचे अनुषंगाने पोलीस स्टेशनचे हद्दीत विमानतळ पोलीस ठाणेचे तपास पथक हददीत गस्त करीत असताना, बर्मासेल लोहगाव परीसरामध्ये एका संशयित इसमास सपोनि विजय चंदन व पोउनि रविंद्र ढावरे यांचे पथकाने ताब्यात घेवुन त्याचेकडे चौकशी करता त्याने त्याचे योगेश संजय गालीकर वय २६ वर्षे रा. गल्ली नं ७ विजयनगर चौधरी पार्क दत्तनगर दिघी पुणे मुळगाव मु पो साकेगाव ता. भुसावळ जि. जळगाव असे असल्याचे सांगितले. त्याचेकडे मिळुन आलेल्या वाहनाबाबत चौकशी करता, सदरची होंडा शाईन MH12 MC 2830 ही गाडी सिग्नेचर हॉटेल विमाननगर पुणे येथुन चोरीस गेलेले निष्पन्न झाले. त्याचेकडे अधिक तपास करता त्याने विमानतळ पोलीस स्टेशनचे हद्दीमध्ये ०४ दुचाकी व दिघी, पिंपरी चिंचवड येथील ०१ दुचाकी चोरी केल्याचे निष्पन्न झाले असुन नमुद इसमाकडुन २,५५,०००/- रुपये किंमतीच्या एकुण ०५ दुचाकी हस्तगत करण्यात आलेल्या आहेत. अटक आरोपीचे पुर्वाभिलेखाची पाहणी केली असता त्याचेवर सुरत, गुजरात येथे गुन्हे दाखल असल्याचे निष्पन्न झालेले आहे.

सदरची कारवाई ही मा. श्री. रितेश कुमार, पोलीस आयुक्त, पुणे शहर, मा. श्री. संदिप कर्णिक, सह आयुक्त, पुणे शहर मा. श्री. रंजन कुमार शर्मा अपर पोलीस आयुक्त, पुर्व प्रादेशिक विभाग पुणे शहर, मा. श्री. शशिकांत बोराटे, पोलीस उप आयुक्त परिमंडळ ०४ पुणे शहर, श्री संजय पाटील सहा. पोलीस आयुक्त, येरवडा विभाग पुणे शहर यांचे आदेशान्वये श्री. विलास सोंडे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, विमानतळ पोलीस स्टेशन पुणे शहर यांचे मार्गदर्शनाखाली सहा. पोलीस निरीक्षक विजय चंदन, पोलीस उप निरीक्षक, रविंद्र ढावरे, पोलीस स्टाफ अविनाश शेवाळे, अंकुश जोगदंडे, नाना कर्चे, दादासाहेब बर्डे, योगेश थोपटे, रुपेश पिसाळ, सचिन जाधव, सचिन कदम, ज्ञानेश्वर आवारी, सचिन जगदाळे यांचे पथकाने केली आहे.

Post a Comment

0 Comments