एल.सी.डी. टीव्ही व हरवलेले १० मोबाईल असे चोरी करणारे अटट्ल गुन्हेगार जेरबंद करून त्यांचेकडुन ८,०९,००० /- रूपयेकिंमतीचा मुदमाल केला हस्तगस्त.

दिनांक. २५/०७/२०२३)
भिगवण पोलीसांची दमदार कामगिरी, शेतकन्यांना दिलासा, शेतकन्यांचा चोरीस गेलेल्या १९ इलेक्ट्रीक पाण्याच्या मोटारी, १ पाण्याचे इंजिन, ३ मोटार सायकली, १ फिज, १ एल.सी.डी. टीव्ही व हरवलेले १० मोबाईल असे चोरी करणारे अटट्ल गुन्हेगार जेरबंद करून त्यांचेकडुन ८,०९,००० /- रूपये
किंमतीचा मुदमाल केला हस्तगस्त.

दिनांक. १९/०७/२०२३ रोजी रात्रौ २२:०० ते दिनांक २०/०७/२०२३ रोजी पहाटे ०७:०० वा चे दरम्यान मौजे डाळज नंबर २ गावचे हददीत डाळज नंबर २ ते कुंभारगाव रोड असा भादलवाडी तलावाचे पायथ्याचे लगत फिर्यादी नामे अवधत दादासाहेब जगताप, रा. डाळज नंबर २, ता.इंदापुर, जि. पुणे यांचे मालकिची टेस्को कंपनीची इलेक्ट्रीक पाण्याची मोटार १२.५ एच.पी.ची कोणीतरी अज्ञात चोरट्याने चोरून नेलेबाबत भिगवण पोलीस स्टेशन, गुन्हा रजि नंबर ३५६/२०२३ भादवि कलम ३७९ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. भिगवण परीसरामधुन शेतकरी यांच्या पाण्याच्या इलेक्ट्रीक मोटार चोरीस जाण्याचे प्रमाण वाढले होते. शेतकरी यावेवर अगोदरच दुष्काळाचे सावट असताना त्यामधुन त्यांच्या इलेक्ट्रीक मोटारी चोरीस जाण्याचे प्रमाण वाढल्यामुळे शेतकरी वर्ग हा हवालदिल झाला होता. त्याचे गांभीर्य पाहुन मा अंकित गोयल सो, पोलीस अधीक्षक, पुणे ग्रामीण, यांनी जिल्हयातील शेतकन्यांशी निगडीत असलेल्या गुन्हयांचा सखोल तपास करून ते गुन्हे उपडकीस आणणेबाबत सक्त सुचना दिल्या होता.

त्यानुसार भिगवण पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी दिलीप पवार, सहा पोलीस निरीक्षक, यानी गुन्हे शोध पथक (डीबी) यांना मार्गदर्शन केले. भिगवण पोलीस स्टेशन येथे वरील प्रमाणे दाखल असलेल्या गुन्हयाचा समांतर तपास चालू असताना गोपनिय बातमीदारा मार्फेत बातमी काढून तसेच तात्रिक विश्लेषणाचे आधारे आरोपी नामे १) विश्वजीत उर्फ सुंदर तुकाराम ढवळे, वय २३ वर्ष, २) रोहन उर्फ सुखराम डोबाळे, वय २१ वर्षे सर्व रा. मदनवाडी, ता. इंदापुर जि.पुणे यांना ताब्यात घेवुन त्यांचेकडे गुन्हयाचा सखोल तपास करता त्यांनी गुन्हा केल्याची कबुली दिली व गुन्हयातील चोरीस गेलेला मुद्देमाल काढून दिला. तसेच त्याचेकडे अधिक विनापुस करता त्यांनी खालील प्रमाणे गुन्हे केल्याची कबुली दिली.

वरील अटक आरोपी यांचेकडुन खालील प्रमाणे गुन्हे आणले उपडकीस आणले आहेत. १) भिगवण पो.स्टे. गुन्हा. रजि.नं. ६३/२०२३ भादवि कलम ३७९

२) भिगवण पो.स्टे. गुन्हा रजि. नं. ९५/२०२३, भादवि कलम ३७९

३) भिगवण पो.स्टे. गुन्हा रजि. नं.१०४/२०२३ भादवि कलम ३७९

४) भिगवण पो.स्टे. गुन्हा रजि. नं. २१८/२०२२, भादवि कलम ३७९ ५) भिगवण पो.स्टे. गुन्हा रजि. नं. ९०/२०२२, भादवि कलम ३७९

६) भिगवण पो.स्टे. गुन्हा रजि. नं. २७३/२०२१, भादवि कलम ३७९

७) भिगवण पो.स्टे. गुन्हा रजि. नं. २२८/२०२१, भादवि कलम ३७९

८) भिगवण पो.स्टे. गुन्हा रजि. नं.१९८ / २०२१, भादवि. कलम. ३७९

९) भिगवण पो.स्टे. गुन्हा रजि. नं.१७६ / २०२१, भादवि. कलम ३७९

१०) भिगवण पो.स्टे. गुन्हा रजि.नं. १६०/२०२१, भादवि कलम ३७९

१९) भिगवण पो.स्टे. गुन्हा रजि.नं.१३४/२०२१ भादवि कलम ३७९

१२) भिगवण पो.स्टे. गुन्हा रजि.नं. १२१ / २०२१, भादवि कलम ३७९

वरील प्रमाणे गुन्हे उपडीस आले असून सदर गुन्हयातील चोरीस गेलेल्या पाण्याच्या १९ इलेक्ट्रीक मोटारी व एक पाण्याचे इंजिन असा एकूण २,६४,०००/- किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

मोटार सायकल / फिज/एल.सी.डी. टी. व्ही. चोरी:- पोलीस स्टेशनचे हद्दीत पेट्रोलींग

करीत असताना एक मोटार सायकल वरून दोन इसम संशईत रित्या गाडीवर इलेक्ट्रीक फिज व एल.सी. डी. टी. व्ही मेवुन जात असताना मिळून आले असता त्यांना थांबुन त्याचेकडे त्याचे ताब्यातील वस्तुबाबत विचारपुस करता त्यांना काहीएक समाधान कारक माहीती देता आली नाही. ते उडवाडविची उत्तरे देव लागली. त्यावेळी पुर्ण खात्री झाली की, सदर इसमांनी सदरच्या वस्तु हया कानून तरी चोरी केल्या असव्यात म्हणुन इसम नामे १) नितीन सखाराम हरीहर, वय ३३ वर्ष, २) सलीम मेहबुब शेख, वय २५ वर्ष, दोघे रा. मदनवाडी, ता. इंदापुर जि.पुणे यांचेविरुध्द भिगवण पोलीस स्टेशन, गुन्हा रजि नंबर ३६०/ २०२३, मुंबई पोलीस कायदा कलम १२४ प्रमाणे गुन्हा दाखल करून त्यांचेकडे अधिक विचारपुस करता त्यांनी आणखी दोन मोटार सायकली काढून दिल्या. अशा प्रमाणे सदर आरोपी याचेकडुन ३ मोटार सायकली.९ इलेक्ट्रीक फिज व १ एल.सी.डी. टी. व्ही. असा एकूण २,०५,०००/- किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. सदर आरोपी यानी सदरच्या वस्तु कोन चोरी केल्या आहेत याबाबत सखोल तपास चालू आहे.

हरवलेले मोबाईल:- भिगवण पोलीस स्टेशनचे हददीतुन सन २०२२/२०२३ या कालावधी तक्रारदार यांचे हरवलेले विविध कंपनीचे मोबाईल यांचा तांत्रिक विश्लेषणाचे आधारे शोध पेवुन एकुण १० मोबाईल असा एकूण अंदाजे किंमत ३,४०,०००/- रू किमतीचा मुद्देमाल हस्तगत केले आहेत.

सदरची कामगिरी मा. अंकित गोयल सो. पोलीस अधीक्षक, पुणे ग्रामीण, मा.आनंद भोईटे सो अपर पोलीस अधीक्षक, बारामती विभाग, पुणे ग्रामीण, मा. गणेश इंगळे सो उपविभागीय पोलीस अधीकारी, बारामती विभाग, यांचे मार्गदर्शनाखाली दिलीप पवार, सहा पोलीस निरीक्षक, भिगवण पोस्टे भिगवण पो. स्टेवे पोलीस उपनिरीक्षक रूपेश कदम, पोलीस अमलदार विठल वारगड, सचिन पवार, महेश उगले, अंकुश माने, हसीम मुलाणी, आप्पा भांडवलकर यांनी केली आहे. गुन्हयाचा पुढील तपास पोलीस अंमलदार विठल वारगड, महेश उगले हे करीत आहेत.

Post a Comment

0 Comments