PUNE CRIME BEAT - Raj Rathod
पुणे : पिंपरी चिंचवड पोलिसांकडून अपहरण झालेल्या ८ वर्षाच्या बालकाची खंडणी विरोधी पथक व रेल्वे सुरक्षा बल पोलिसांच्या मदतीने २ तासांमध्ये सुटका केली आहे, या संदर्भात एका आरोपीला अटक करण्यात आली आहे,
चाळीसगाव रेल्वे पोलीस स्टेशन याठिकाणी जावून आरोपी गजानन सुपडा पानपाटील, वय २५ वर्षे, रा. पुनई, ता. मोताळा, जि. बुलढाणा व अपहत बालकास ताब्यात घेवून पुढील कार्यवाहीकामी चिंचवड पोलीस ठाणे, पिंपरी चिंचवड यांचे ताब्यात देण्यात आले आहे. पुढील अधिक तपास चिंचवड पोलीस स्टेशन करत आहे.
अधिक माहिती अशी की,
दिनांक १ एप्रिल २०२५ रोजी दुपारी १२ च्या सुमारास चिंचवड पोलीस ठाणे येथे फिर्यादी महिला यांनी त्यांच्या ८ वर्षाच्या मुलाचे दिनांक. ३१/०३/२०२५ रोजी सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास चिंचवड येथून अपहरण झाल्याचे कळविताच तात्काळ तक्रारदार महिलेची तक्रार चिंचवड पोलीस ठाणे येथे दाखल करून या संदर्भात गुन्हा दाखल करण्यात आला,
अपहरणाची माहिती प्राप्त होताच मा. पोलीस उप-आयुक्त गुन्हे यांनी समांतर तपास करण्याबाबत आदेशित केल्याने खंडणी विरोधी पथकातील वरिष्ठ पोलीस निरीक्षक देवेंद्र चव्हाण यांनी तात्काळ सीसीटीव्ही फुटेज, आरोपीचा फोटो व मोबाईल नंबर प्राप्त केला. संशयित इसमाचे मोबाईल नंबरचे तांत्रिक विश्लेषण करून संशयित इसम अपह्त मुलास घेवून रेल्वेने जात असल्याचे निदर्शनास आल्याने वरिष्ठ पोलीस निरीक्षक देवेंद्र चव्हाण यांनी तात्काळ भुसावळ पोलीस स्टेशन, रेल्वे सुरक्षा बल, सरकारी रेल्वे पोलीस, भुसावळ रेल्वे स्टेशन, मुक्ताईनगर, जळगांव, चाळीसगांव पोलीस स्टेशन यांना संपर्क करून संशयित इसम व अपहृत बालकाचे सीसीटीव्ही फुटेज, फोटो व लोकेशन त्यांना पाठवून,
रेल्वे सुरक्षा बल यांनी रेल्वे स्टेशन वरील मिळालेल्या संशयित इसम व अपह्त बालकाचे सीसीटीव्ही फुटेज वपोनि देवेंद्र चव्हाण यांना पाठवून त्याची शहानिशा केली. संशयित इसम अपह्त बालकास घेवून काशी एक्सप्रेस मध्ये बसले असल्याचे निष्पन्न झाल्याने रेल्वे सुरक्षा बल यांनी रेल्वे स्टेशन येथे संशयित इसमास ताब्यात घेवून अपह्त बालकाची सुखरुप सुटका केली. त्यादरम्यानच मा. वरीष्ठांचे आदेशान्वये खंडणी विरोधी पथकाचे पोलीस उपनिरीक्षक सुनिल भदाणे, पोअंम. प्रदिप पोटे व ज्ञानेश्वर कुऱ्हाडे यांना तपासकामी रवाना करण्यात आले होते. त्यांनी चाळीसगाव रेल्वे पोलीस स्टेशन याठिकाणी जावून आरोपी गजानन सुपडा पानपाटील, वय २५ वर्षे, रा. पुनई, ता. मोताळा, जि. बुलढाणा व अपहत बालकास ताब्यात घेवून पुढील कार्यवाहीकामी चिंचवड पोलीस ठाणे, पिंपरी चिंचवड यांचे ताब्यात देण्यात आले आहे. पुढील अधिक तपास चिंचवड पोलीस स्टेशन करत आहे.
सदरची कारवाई मा. पोलीस आयुक्त श्री. विनय कुमार चौबे, मा. पोलीस सह-आयुक्त डॉ. शशिकांत महावरकर, मा. अपर पोलीस आयुक्त श्री. वसंत परदेशी, मा. पोलीस उप-आयुक्त, गुन्हे श्री. संदिप डोईफोडे, मा. सहा. पोलीस आयुक्त गुन्हे-२ श्री. बाळासाहेब कोपनर मा. सहा. पोलीस आयुक्त गुन्हे-१ डॉ. विशाल हिरे यांचे मार्गदर्शनाखाली वपोनि शैलेश गायकवाड युनिट- २ वपोनि अंकुश बांगर चिंचवड पोलीस ठाणे, वपोनि देवेंद्र चव्हाण, खंडणी विरोधी पथक तपोउपनि तसेच खंडणी विरोधी पथकाचे पोउपनिरी सुनिल भदाणे, सपोउपनि सुनिल कानगुडे, पोलीस अंमलदार प्रदिप पोटे, ज्ञानेश्वर कुऱ्हाडे, प्रदिप गोंडाबे तसेच सपोउपनि नागेश माळी (ता.वि.वि) रेल्वे सुरक्षा बल तसेच जळगाव जिल्हा पोलीस दल यांचे पथकाने केली आहे.
0 Comments