(PCB NEWS) पुणे: घरफोडीतील पाहिजे असलेला गुन्हेगार नामे महेश चव्हाण याचा शोध विश्रांतवाडी पोलीस स्टेशनचे तपास पथकाचे अधिकारी व अंमलदार घेत असताना तपास पथक प्रमुख नितीन राठोड यांना बातमी मिळाली सदरचा गुन्हेगार हा हडपसर गंगानगर येथे त्याचे मित्रांसह थांबलेला आहे.
बातमीप्रमाणे तपास पथकाचे पोलीस अधिकार व पोलीस अंमलदार यांनी सदर ठिकाणी जाऊन सापळा रचून आरोपी नामे महेश काशिनाथ चव्हाण वय १९ वर्षे रा. बंटर स्कूलचे मागे, हडपसर पुणे यास पकडून त्याचेकडे गुन्हयाबाबत तपास करुन त्याचेकडून गुन्हयात चोरीस गेलेला किं.रु.२,६१,०००/- रु. कि.चे सोन्याचे दागिने व मोटार सायकल असा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून आरोपीकडून विश्रांतवाडी पोलीस स्टेशनकडील घरफोडीचे दोन गुन्हे व कोंढवा पोलीस स्टेशन येथील वाहन चोरीचा एक गुन्हा उघड करण्यात आला आहे.
सदरची कामगिरी मा. अपर पोलीस आयुक्त, पुर्व प्रादेशिक विभाग, पुणे श्री. मनोज पाटील, मा. पोलीस उप-आयुक्त परि. ४. पुणे श्री. हिंम्मत जाधव, मा. सहा. पोलीस आयुक्त, खडकी विभाग, श्रीमती अनुजा देशमाने विश्रांतवाडी पोलीस स्टेशनच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीमती कांचन जाधव, पोलीस निरीक्षक (गुन्हे), श्री मंगेश हांडे, यांचे मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे पोलीस उप निरीक्षक नितीन राठोड, पोलीस अंमलदार बबन वणवे, यशवंत किर्वे, कृष्णा माचरे, अमजद शेख, वामन सावंत, संजय बादरे, संपत भोसले, संदीप देवकाते, अक्षय चपटे, किशोर भुसारे यांनी केली आहे.
0 Comments