PUNE CRIME BEAT (PCB NEWS) युनिट २ गुन्हे शाखेची कारवाई.
कोरेगाव पार्क या ठिकाणी काही दुकानांमध्ये ब्रॉन्डेड कंपनीचे बनावट कपडे व इतर वस्तू विक्री करणाऱ्या दुकानांवर छापा टाकून कारवाई करण्यात आली आहे, त्यामध्ये गुन्हे शाखा युनिट २ बनावट कपडे व इतर वस्तू विक्री करणाऱ्या, दोन जणांसह एका महिलेवर
कोरेगाव पार्क पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे, दुकानातून ३५ लाख ३१ हजार ५१ रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आले आहे,
मिळालेल्या माहितीनुसार.
पुणे शहरात वेगवेळया ठिकाणी ब्रॉन्डेड कंपनीचा बनावट मालाची विक्री होत असलेबाबत माहिती मिळाली होती. त्या अनुषंगान कारवाई करणेकामी मा.पोलीस उप आयुक्त गुन्हे श्री. निखिल पिंगळे यांचे मार्गदर्शनाप्रमाणे गुन्हे शाखा युनिट 2 प्रभारी श्री. प्रताप मानकर, यांचे पथकातील पोलीस अधिकारी व अंमलदार तसेच कंपनीचे अधिकृत प्रतीनिधी मार्फत पुणे शहरात शोध मोहिम चालू असताना प्राप्त माहितीनुसार,कोरेगाव पार्क भागातील नार्थ रोडवरील इनक्लॉथ स्टोअर्स व कोरेगाव पार्क मधील मेन रोडवरील डिनोव्हो क्लॉथ स्टोअर्स मध्ये LACOSTE,UNDERARMOUR, POLU ,GANT या ब्रॉडेड कंपनीचे रजिस्ट्रेशन असलेले वरील कंपनीचे बनावट लेबल व लोगोचा वापर करुन हुबेहुब दिसणारे बनावट कपडे व इतर वस्तू विक्री चालू होती.
त्याप्रमाणे सदर माहितीची खात्री करुन दिनांक 04/12/2024 रोजी गुन्हे शाखा युनिट 2 कडील पथकाने कोरेगाव पार्क भागातील 1) नार्थ रोडवरील इनक्लॉथ स्टोअर्स व 2) डिनोव्हो क्लॉथ स्टोअर्स मध्ये छापा कारवाई केली असता सदर दोन्ही शॉपमधुन वरील प्रमाणे एकुण 35,31,051 रु. LACOSTE, UNDERARMOUR, POLU ,GANT NIKE या ब्रॉडेड लोगो वापरुन दुकानाचे मालक 1) मोनिश लिलाराम अकतराय वय 23 वर्ष रा.2020 अशोका बिÏल्डग ग्रीन व्हॅली वानवडी पुणे 2) सोनू राम लोकनादन वय 26 रा.लेन नंबर 4 अजिंक्य तारा सोसायटी कवडेनगर नवी सांगवी व 3) एक ंमहिला यांच्यावर कारवाई केली असून,त्याबाबत कोरेगाव पार्क पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजि.क्रमांक 179/2024 कॉपीराईट अॅक्ट 1957 चे कलम 63, 65 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरची कामगिरी मा.अपर पोलीस आयुक्त श्री शैलेश बलकवडे ,पोलीस उप आयुक्त गुन्हे श्री निखिल पिंगळे,मा. सहायक पोलीस आयुक्त गुन्हे 1 श्री गणेश इंगळे यांचे मागदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट 2 प्रभारी पोलीस निरीक्षक प्रताप मानकर,सहायक पोलीस निरीक्षक अमोल रसाळ,पोलीस उप निरीक्षक नितिन कांबळे, पोलीस अंमलदार शंकर नेवसे, अमोल सरडे, ओमकार कुंभार, संजय आबनावे ,गणेश थोरात, हनुमंत कांबळे, साधना ताम्हाणे, पुष्पेद्र चव्हाण, विजय पवार, प्रमोद कोकणे, निखिल जाधव, नागनाथ राख या पथकाने केली आहे
0 Comments