पुणे: घोरपडी गाव येथून गांजा विक्री करणाऱ्या एकास केले जेरबंद, ४ किलो १५२ ग्राम गांजा जप्त, अंमली पदार्थ विरोधी पथक १ गुन्हे शाखा,

PUNE CRIME BEAT( PCB NEWS) अंमली पदार्थ विरोधी पथक-१ चे पोलीस निरीक्षक श्री. उल्हास कदम व त्यांचा पोलीस स्टाफ असे वानवडी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये पेट्रोलिंग करत असताना अमली पदार्थ विरोधी पथक यांना गांजा विक्री संदर्भात माहिती मिळाली, मिळालेल्या माहितीच्या ठिकाणी घोरपडी गाव येथे जाऊन सापळा रचुन इसम नामे नितेश रणजित कंजारभाट वय ४० वर्षे, रा. हनुमाननगर, घोरपडी गाव, पुणे याला ताब्यात घेऊन त्याची झडती घेतली असता सदर व्यक्तीकडून ४ कीलो १५२ ग्रॅम गांजा अंमली पदार्थ व इतर ऐवज मिळुन आले, मुद्देमालाची किंमत ८३ हजार,४० रुपये असून, त्यांचेविरुध्द वानवडी पोलीस ठाणे, येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अधिक माहिती अशी की,
मा. वरिष्ठ पोलीस अधिकारी यांनी पुणे शहरातील गुन्हेगारीला आळा घालण्याकरिता तसेच अंमली पदार्थ तस्करांची माहिती काढुन त्यांचे विरूद्ध कारवाई करणेबाबत दिलेल्या सुचना व आदेशानुसार अंमली पदार्थ विरोधी पथक-१ चे पोलीस निरीक्षक श्री. उल्हास कदम व त्यांचा पोलीस स्टाफ असे पुणे पोलीस आयुक्तालयाचे हद्दीमध्ये गुन्हे प्रतिबंधात्मक, तसेच अंमली पदार्थाचे गैरव्यवहाराचे अनुषंगाने माहिती काढुन कारवाई करण्याकरीता दि.०४/१२/२०२४ रोजी वानवडी पोलीस स्टेशन कार्यक्षेत्रात रवाना झाले, अंमली पदार्थ विरोधी पथक-१ कडील अधिकारी व अंमलदार पेट्रोलिंग करीत असताना, पेट्रोलिंग दरम्यान पोलीस अंमलदार विशाल दळवी यांना प्राप्त झालेल्या माहितीचे अनुषंगाने शिवकिर्ती जनरल स्टेअर व बेकरी प्रोडक्ट दुकाणा समोर, सार्वजनिक रोडवर, घोरपडी गाव, पुणे या ठिकाणी सापळा रचुन इसम नामे नितेश रणजित कंजारभाट वय ४० वर्षे, रा. हनुमाननगर, घोरपडी गाव, पुणे यास ताब्यात घेतले असता, त्याचे झडतीमध्ये कि. रु.८३,०४०/- किंमतीचा, त्यामध्ये ०४ किलो १५२ ग्रॅम गांजा अंमली पदार्थ व इतर ऐवज मिळुन आल्याने त्यांचेविरुध्द वानवडी पोलीस ठाणे, पुणे गु.र.नं.६२७/२०२४ एन. डी. पी. एस. अॅक्ट कलम ८ (क), २० (ब) (ii) (ब) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

सदरची कारवाई ही मा. अपर पोलीस आयुक्त, गुन्हे, पुणे शहर, श्री. शैलेश बलकवडे, मा. पोलीस उप आयुक्त, गुन्हे, पुणे श्री. निखील पिंगळे, मा. सहा. पोलीस आयुक्त, गुन्हे १, श्री. गणेश इंगळे यांचे मार्गदर्शनाखाली अंमली पदार्थ विरोधी पथक, १ गुन्हे शाखा, पुणे शहर कडील पोलीस निरीक्षक श्री. उल्हास कदम, सहा. पो. निरीक्षक अनिकेत पोट, पोलीस उप-निरीक्षक आदलिंग (वानवडी पो.स्टे.) तसेच पोलीस अंमलदार सर्फराज देशमुख, दया शेगर, मदगे, विशाल दळवी, संदिप शिर्के, सचिन माळवे, विनायक साळवे, प्रविण उत्तेकर, संदेश काकडे, दत्ताराम जाधव, सुजित वाडेकर, मारुती पारधी, नुतन वारे, रेहाना शेख, विपुल गायकवाड, योगेश मोहिते यांनी केली आहे.

Post a Comment

0 Comments