PUNE CRIME BEAT( PCB NEWS )
न्यु मोदिखाना कॅम्प,  पुणे येतील दुकानाचे शटर उचकटुन १०  मोबाईल चोरी झाल्याची तक्रार लष्कर पोलीस स्टेशन येथे करण्यात आली होती, त्याच अनुषंगाने, लवकरात लवकर आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलीस उप आयुक्त परिमंडळ २, श्रीमती स्मार्तना पाटील, यांच्याकडून सूचना मिळाले,लष्कर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गिरिषकुमार दिघावकर, यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी पथक तयार करून वेगवेगळ्या ठिकाणांचे सी सी टीव्ही फुटेज तपासून आरोपींचा शोध घेऊन त्यांना अटक करण्यात आले आहे, आरोपीकडून १० मोबाईल हस्तगत करण्यात आले आहे, पुढील तपास लष्कर पोलीस स्टेशन करत आहे,सदर गुन्ह्यातील आरोपी यांच्याकडून आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे,

अधिक माहिती अशी की
पुणे लष्कर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता की, फिर्यादी राहणार  कोंढवा, पुणे यांचे मालकीचे सेल एक्स्प्रेस या नावाचे मोबाईल विक्रीचे दुकान मरियम मंझिल, न्यु मोदिखाना कॅम्प, पुणे या ठिकाणी असुन, सदर दुकान दिनांक ३/१२/२०२४ रोजी रात्री दरम्यान बंद असताना दुकानाचे शटर उचकटुन अज्ञात चोरट्यांनी घर फोडी करून दुकानातील वनप्लस व ओपो कंपनीचे एकुण १० मोबाईल किंमत रूपये ४४,०००/- असा माल घरफोडी चोरी करून चोरून नेला आहे, प्रस्तुत प्रकरणी अज्ञात चोरट्यांविरूध्द दि. ०३/१२/२०२४ रोजी लष्कर पो. स्टे. येथे वर उल्लेखीत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

घरफोडी चोरी करणारे गुन्हेगारांबद्दल कोणतीही माहिती उपलब्ध नसताना, वरिष्ठांचे मार्गदर्शनाखाली लष्कर पोलीस ठाणे कडील तपास पथकाचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी घटनास्थळावरील तसेच आजुबाजुचे परिसरातील सीसीटिव्ही फुटेज पडताळुन पाहणी केली असता, तसेच तांत्रिक विश्लेषणाच्या माध्यमातुन मिळालेल्या माहितीच्या आधारे आरोपींचा शोध घेण्यास सुरूवात केली, व अथक प्रयत्नाने सापळा रचुन गुन्ह्यातील आरोपी यांना पकडण्यात आले असुन त्यांना गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे, सदर आरोपींची नावे १) शाहरूख सलाउद्दीन खतीब, वय २४ वर्ष, रा. घर क्र. २०४, गल्ली क्र. २५, भाग्योदय नगर, किर्ती इमारतीसमोर, कोंढवा, पुणे, २) सलिम हसन शेख, वय २४ वर्ष, रा. शेख अब्दुल रेहमान चौक, कासेवाडी, भवानीपेठ, पुणे, ३) सर्फराज पाशा शेख, वय २२ वर्ष, रा. शेख अब्दुल रेहमान चौक, कासेवाडी, भवानीपेठ, पुणे, ४) अजीम बबलु शेख, वय २० वर्ष, रा. भगवा चौक, कासेवाडी, भवानीपेठ, पुणे, अशी असुन ते आरोपी शहारूख खतीब हा पोलीसा अभिलेखावरील घरफोडी करणारा सराईत गुन्हेगार असल्याची माहिती प्राप्त झाली असुन त्याचेवर एकुण ५ घरफोडी चोरीचे गुन्हे दाखल आहेत. आरोपींकडुन लष्कर पो. स्टे कडील दाखल गुन्ह्यातील एकुण ४४,०००/- रू. किंमतीचे वन प्लस व ओपो कंपनीचे एकुण १० मोबाईल हस्तगत करण्यात आले आहेत. गुन्ह्याचा तपास पोलीस उप-निरिक्षक राहुल घाडगे, हे करीत आहेत.

उपरोक्त कामगीरी ही मा. पोलीस उप आयुक्त परिमंडळ २, श्रीमती स्मार्तना पाटील, मा. सहा. पोलीस आयुक्त लष्कर विभाग, श्री. दिपक निकम, यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. गिरिषकुमार दिघावकर, पोलीस निरिक्षक (गुन्हे) श्री. प्रदिप पवार, पोलीस उप निरिक्षक राहुल घाडगे, यांचे नेतृत्वाखाली, तपास पथकातील पोलीस अंमलदार महेश कदम, सोमनाथ बनसोडे, संदिप उकिर्डे, रमेश चौधर, सचिन मांजरे, लोकेश कदम,. हराळ, कोडिलकर, महिला पोलीस अंमलदार अल्का ब्राम्हणे, यांनी केलेली आहे.