दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक २,गुन्हे शाखा ,पुणे शहर. लोणीकंद पोलीस स्टेशन हद्दीतील अवैध दारू भट्टीवर कारवाई, २ जणांवर गुन्हा दाखल.

मा. संदिपान पवार वरिष्ठ पोलीस निरीक्षक
(PCB NEWS) दिनांक १५/११/२०२४ रोजी रात्रीचे१०:४५ वा. चे सुमारास पथकाकडील  पोलीस अंमलदार  अमोल सरतापे व विनायक येवले यांना माहिती मिळाली की,  माऊलाई चौक ,वाळके  वस्ती, पेरणे, ता.हवेली जिल्हा पुणे येथे  भट्टी लावून दारू तयार करण्यात येत आहे. सदर ठिकाणी छापा टाकला असता  ३५  लिटर गावठी हातभट्टीची तयार दारू  व १६, ०००  लिटर कच्चे रसायन  व इतर साहित्य असा एकूण ८ लाख, ४४ हजार - रू किं चा मुद्देमाल मिळून आला. सदरबाबत गणेश धनाजी परदेशी व शितल गणेश परदेशी या इसमाविरुद्ध लोणीकंद पोलीस स्टेशन येथे  महाराष्ट्र दारूबंदी कायदा, कलम 65 (ब) (क)(ड) (इ) (फ) प्रमाणे गुन्हा नोंद केला आहे.

सदरची कामगिरी मा शैलेश बलकवडे अप्पर पोलीस आयुक्त गुन्हे, मा निखिल पिंगळे पोलीस उपायुक्त गुन्हे,मा राजेंद्र मुळीक सहा पोलीस आयुक्त गुन्हे २ यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संदिपान पवार ,सपोनी छबू बेरड, राजेश अभंगे ,अशोक आटोळे ,राजेश लोखंडे, सुदेश सपकाळ, अमोल सरतापे, विनायक येवले ,राहुल इंगळे ,विक्रांत सासवडकर ,संदीप येळे यांनी केली आहे.

Post a Comment

0 Comments