(PCB NEWS) मा. पोलीस आयुक्त श्री. अमितेशकुमार, मा. पोलीस सह आयुक्त श्री. रंजनकुमार शर्मा, मा. अपर पोलीस आयुक्त गुन्हे, श्री शैलेश बलकवडे, मा. पोलीस उप आयुक्त गुन्हे श्री. निखिल पिंगळे यांनी विधानसभा निवडणुक २०२४ च्या अनुषंगाने संशयितांवर प्रतिबंधात्मक कारवाई करावी, रेकॉर्ड वरील वाहनचोर, घरफोडी करणारे, मालमत्ते विरुद्ध व शरीरा विरुद्ध गंभीर गुन्हे करणारे, तडीपार यांना चेक करुन मिळुन आल्यास कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश दिले होते.
त्याअनुषंगाने युनिट ४ कडील पथक हे येरवडा पोलीस स्टेशन हददीत गुन्हे प्रतिबंधक पेट्रोलींग करत लक्ष्मीनगर भाजी मार्केट जवळ आले असताना पोलीस उपनिरीक्षक वैभव मगदुम यांना गोपनीय माहिती मिळाली की, रेकॉर्ड वरिल गुन्हेगार अनिकेत राजु साठे व आदित्य सतीश घमरे, हे गुंजन चौक येरवडा पुणे येथे सरगम हॉटेल जवळ मोकळ्या जागेत कल्पना सोसायटीचे भिंती लगत पिस्टलसह बसलेले असुन ते कोणता तरी दखलपात्र गुन्हा करणे चे तयारीत असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली.
सदरची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजय वाघमारे यांना कळविली असता, त्यांनी बातमी प्रमाणे जावून खात्री करुन मिळून आल्यास कारवाई करण्याचे आदेश दिल्याने लागलीच युनिट-४ पथकातील अधिकारी व अंमलदार हे बातमीचे ठिकाणी जावून खात्री केली असता बातमीतील आरोपी हे गुंजन चौक येरवडा पुणे येथे सरगम हॉटेल जवळ मोकळ्या जागेत कल्पना सोसायटीचे भिंती लगत बसलेले दिसले. पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी सदर संशयितास ताब्यात घेवुन त्यांना त्यांचे नाव-पत्ता विचारले असता त्याने त्याचे नाव१) अनिकेत राजु साठे वय २१ वर्षे रा. स. नं. २, गाडीतळ, जॉनपॉल ऑफिसचे पाठीमागे, येरवडा पुणे २) आदित्य सतीश घमरे वय २१ वर्षे रा. सदर असे सांगितले. त्याची अंगझडती घेतली असता अ.नं. १ व २ यांचे कंबरेस खोचलेली दोन देशी बनावटीची पिस्टल व त्यांचे खिशामध्ये दोन जिवंत राऊंड असे एकूण १,०२,०००/- रू. किं.चा मुद्देमाल मिळून आलेने पंचनाम्याने ते जप्त केले. सदर आरोपी व जप्त मुद्देमाल हा पुढील कायदेशीर कारवाई करीता येरवडा पोलीस ठाणेचे ताब्यात देण्यात आले आहे. पुढील तपास येरवडा पोलीस ठाणे करीत आहे.
सदरची उल्लेखनिय कामगिरी मा. पोलीस आयुक्त श्री. अमितेशकुमार, मा. पोलीस सह आयुक्त श्री. रंजनकुमार शर्मा, मा. अपर पोलीस आयुक्त गुन्हे, श्री शैलेश बलकवडे, मा. पोलीस उप आयुक्त गुन्हे श्री. निखिल पिंगळे, मा. सहा. पोलीस आयुक्त गुन्हे-२ श्री. राजेंद्र मुळीक, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजय वाघमारे, यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक, वैभव मगदुम, दिगंबर चव्हाण, सहा.पो.फौ. प्रविण राजपुत, यस्मिन सय्यद, पोलीस अंमलदार हरिष मोरे, अजय गायकवाड, प्रविण भालचीम, विठ्ठल वाव्हळ, संजय आढारी, विशाल गाडे, विनोद महाजन, एकनाथ जोशी.. नागेशसिंग कुंवर, जहांगिर पठाण, विशाल इथापे, मनोज सांगळे, वैभव रणपिसे, देविदास वाढरे, राहुल परदेशी, सुभाष आव्हाड, भरत गुंडवाड, महिला पोलीस अंमलदार रोहिणी पांढरकर, मयुरी नलावडे यांनी केली आहे.
0 Comments