शिक्रापूर पोलीस स्टेशन येथील खुनाच्या गुन्ह्यामध्ये दोन वर्षापासून फरार असलेल्या आरोपीला युनिट ५ गुन्हे शाखा पुणे शहर यांनी सापळा रचून माळवाडी हडपसर येथून अटक केली आहे, आरोपीला पुणे ग्रामीण शिक्रापूर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
पुणे ग्रामीण पोलीस कडील शिक्रापुर पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर १०७८/२०२२ भादवि कलम. ३०२,१४१,१४३,१४७,१४८,१४९,३४१,३२. हा खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी. धन्या ऊर्फ धनराज शांतीलाल शेरावत हा गुन्हा केल्यानंतर सुमारे २ वर्षापासुन स्थानिक पोलीसांना गुंगारा देवुन लपुन बसत होता.
दि.२८/०८/२०२४ युनिट ५ गुन्हे शाखा यांना माहिती मिळाली की, शिक्रापुर पोलीस स्टेशन कडील, खुनाच्या गुन्ह्यामध्ये फरार असलेला आरोपी धनराज शांतीलाल शेरावत, वय. २३ वर्षे, रा. म्हसोबा नगर म्हशीच्या गोटया जवळ, वेस्टन फोरजी कंपनी, सणसवाडी तळेगाव रोड, ता. शिरुर जि.पुणे हा अमरधाम स्मशानभुमीजवळ माळवाडी हडपसर पुणे या ठिकाणी आला असल्याची माहिती मिळाल्याने युनिट ५ कडील पोलीस पथकाने त्यास सापळा रचुन जेरबंद केले.
आरोपी धन्या ऊर्फ धनराज शांतीलाल शेरावत यास ताब्यात घेवुन त्याची ओळख पटवुन त्याने व त्याचे साथिदारांनी मिळुन सणसवाडी परिसरामध्ये खुन केला असल्याचे निष्पन्न झाल्याने त्यास पुढील कार्यवाही करीता शिक्रापुर पोलीस स्टेशन, पुणे ग्रामिण यांचे ताब्यात देण्यात आलेले आहे.
सदरची कामगिरी मा. पोलीस उप आयुक्त गुन्हे श्री. निखील पिंगळे, मा. सहायक पोलीस आयुक्त श्री. सतिश गोवेकर यांचे सुचना व मार्गदर्शनाप्रमाणे युनिट ०५ गुन्हे शाखा, पुणे शहर कडील पोलीस निरीक्षक श्री. युवराज हांडे, सपोनि. कृष्णा बाबर, पोलीस अंमलदार राजस शेख, प्रमोद टिळेकर, प्रताप गायकवाड, विनोद निंभोरे, विनोद शिवले, पृथ्वीराज पांडुळे, तानाजी देशमुख, सचिन मेमाणे, शहाजी काळे, स्वाती गावडे, पल्लवी मोरे, शशिकांत नाळे, अमित कांबळे, अकबर शेख, राहुल ढमढेरे, उमाकांत स्वामी व शुभांगी म्हाळशेकर यांचे पथकाने केली आहे.
0 Comments