पुणेः पोलीस पत्नी विषयी बेताल आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या नितेश राणे यांचा निषेध करतो. ते वरिष्ठांना बदली करण्याची धमकी देतात. हे कोण आहेत बदली करणारे? त्यासाठी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस भक्कम आहेत. पोलीस अधिकाऱ्यांनी काही चूक केल्यास त्यांच्यावर खात्यांतर्गत कारवाई होते. सेवानिवृत्त पोलीस बांधव कल्याणकारी संस्थेचे अध्यक्ष संपत जाधव यांनी सांगितले,
नितेश राणे यांनी पोलिसंविषयी केलेल्या आक्षपार्ह विधानाच्या निषेधार्थ सेवानिवृत्त पोलीस बांधव कल्याणकारी संस्थेने जिल्हाधिकारी कार्यालयावर निषेध मोर्चा काढला. यावेळी मोठ्या संख्येने सेवानिवृत्त पोलिस कर्मचारी अधिकारी उपस्थित होते.
यावेळी बोलताना जाधव म्हणाले की, नितेश राणे यांनी पोलीस पत्नी विषयी व पोलीस बांधवाविषयी केलेले बेताल वक्तव्य पोलीस दलाची प्रतिमा मलीन करणारे आहे. त्यांच्यावर कार्यवाही होणे आवश्यक आहे. पोलिसांच्या समस्यांबाबत यापूर्वी वेळोवेळी अर्ज व निवेदने दिले आहेत. परंतु कार्यालयीन कर्मचारी यांच्या दप्तर दिरंगाई मुळे सेवानिवृत्त पोलीस बांधवांना, अध्याप न्याय मिळाला नाही.सेवानिवृत्त पोलीस बांधवांना त्यांचे
न्याय हक्कासाठी निवेदन द्यावे लागणे ही खेदाची व लाजिरवाणी गोष्ट आहे.
सेवानिवृत्त पोलिसांना अर्ज करून सुद्धा अद्याप सेवापटाची छायांकीत प्रत मिळालेली नाही. ती त्यांना मिळणे आवश्यक आहे. १०,२०,३० च्या अनुषंगाने एस १४ ची वेतन श्रेणी प्राप्त करण्यासाठी, दिलेल्या अर्जावर निर्णय घेण्याचे अधिकार घटक प्रमुखांचे आहेत. त्याबाबत अर्ज करूनदेखील त्यावर अद्याप कार्यवाही झालेली नाही. ती होणे अपेक्षित आहे. मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशान्वये, सेवानिवृत्त पोलीस हे ज्या दिनांक पासून निवृत्त झाले आहेत. त्यांना एक जुलै च्या वेतन वाढीचा फरक मिळावा व त्याप्रमाणे वेतन निश्चिती बाबत न्यायालयाचे आदेश आहेत. परंतु त्यावर सुद्धा कार्यवाही झालेली नाही.
सेवानिवृत्तीनंतर मिळणारी रक्कम, ही विलंबाने मिळत असल्यामुळे, दरम्यानच्या कालावधीमध्ये आर्थिक परिस्थितीला तोंड द्यावे लागते. विलंब कालावधीतील रकमेवर व्याजासह रक्कम मिळावी.
सातव्या वेतन आयोगाचा पाचवा हप्ता सेवानिवृत्त पोलिसांना मिळालेला नाही तो मिळावा अशा मागण्या यावेळी करण्यात आल्या.
0 Comments