पुणे-दुचाकीस्वाराकडून वाहतूक पोलिसाला मारहाण, कात्रज बायपास चौकातील घटना, वाहन चालकावर भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल.

पुणे क्राईम बीट:- दिनांक १६-८-२४ रोजी ११ वाजताच्या कात्रज बायपास चौक कात्रज पुणे येथे 
दिपक सदाशिव भोईर पोलिस अमंलदार, वाहतुक शाखा फिर्यादी हे शासकीय गणवेशात त्यांचे इतर पोलीस सहका-यांन सोबत कात्रज बायपास चौकात वाहतुक नियमन करत असताना,

आशीष रामचंद्र चव्हाण वय ३७ वर्ष रा. धनकवडी पुणे, हा त्याचे ताब्यातील दुचाकी ही जोराने व वेडीवाकडी चालवून वाहतुक नियमभंग करत आल्याने त्याला बाजुला
घेवुन वाहनाची तपासणी केली असता 
त्याच्याजवळ असलेल्या वाहनावर वाहतुकीचे नियम मोडल्याप्रकरणी २० खटले असल्याचे वाहतूक पोलिसांना समजले, लायसन कागदपत्र मागत असता त्याने वाहतूक पोलिसांसोबत अरेरावी व उध्दट वर्तन करत फिर्यादी यांना हाताने मारहान करुन फिर्यादी च्या डाव्या गुडघ्यावर व कंबरेवर जोरजोराने लाथा मारून फिर्यादी यांचे डाव्या गुडघ्याला गंभिर दुखापत करून वाईट शिवीगाळ करून फिर्यादी यांचा शासकीय गणवेषाचा खिसा फाडून जिवे ठार मारण्याची धमकी देवुन शासकीय कामात अडथळा निर्माण केला आहे, या संदर्भात आशीष रामचंद्र चव्हाण याला अटक करून भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल केला आहे.

Post a Comment

0 Comments