पुणे: महिलांच्या गळ्यातील सोन्याचे चेन व मंगळसूत्र हिसकवणाऱ्या चोरट्याला भारती विद्यापीठ पोलिसांकडून अटक, आरोपीकडून २ लाख २५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त.

पुणे क्राईम बीट :- भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन येथे दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी गळ्यातील मंगळसूत्र चोरून नेले यासंदर्भात गुन्हा दाखल करण्यात आला होता, दिनांक २३ ऑगस्ट २०२४ रोजी दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास आंबेगाव पठार परिसरात फिर्यादीच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र एका अज्ञात इसमाने जबरदस्तीने ओढून चोरी केले बाबत, फिर्यादीच्या तक्रारीवरून भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता. वरीष्ठ पोलीस निरीक्षक दशरथ पाटील व पोलीस निरीक्षक गुन्हे शरद झिने यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाने आरोपीचा शोध घेतला. तांत्रिक विश्लेषणाद्वारे पांढऱ्या रंगाच्या अॅक्टीव्हा दुचाकीवरील संशयित आरोपीची   पोलिसांना माहिती मिळाली 

 तपासादरम्यान, तपास पथकाचे अधिकारी व अंमलदारांनी आरोपी समर्थ राजु कोंथीबिरे याला लेकटाऊन भागातून अटक करण्यात आले आहे, त्याने गुन्ह्याची कबुली दिली असून त्याच्याकडून २ लाख २५ हजार- रुपये किंमतीचे ३२ ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र, हार,आणि चोरीस गेलेली दुचाकी गाडी जप्त करण्यात आली आहे. या तपासादरम्यान आरोपीकडून एकूण ३ गुन्हे उघडकीस आले आहेत.

भारती विद्यापीठ पोलिसांच्या  कार्यक्षम तपासामुळे हा गुन्हा उघडकीस आला आहे.

अधिक माहिती अशी की,
दिनांक २३/०८/२०२४ रोजी दुपारी ०३.१० वा ते ०३.२० वा चे सुमारास भास्कर महाडकी सनं २५/४ खेडेकर चाळ, महादेव मंदीराची समोरील लेन, आंबेगाव पठार, पुणे येथुन फिर्यादी हया पायी जात असताना पांढरे रंगाचे अॅक्टीव्हा दुचाकी गाडी वरील अनोळखी इसमाने फिर्यादी यांचे गळयातील १५ ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसुत्र जबरदस्तीने ओढुन चोरी केले आहे म्हणुन फिर्यादी यांनी दिले तक्रारीवरुन भारती विदयापीठ पोलीस स्टेशन, गुन्हा रजि नंबर ६८५/२०२४ भारतीय न्याय संहीता कलम ३०९ (४) अन्वये गुन्हा दाखल आहे.

दाखल गुन्हयातील अनोळखी आरोपीचा शोध घेणेबाबत मा. वरीष्ठ पोलीस निरीक्षक डी.एस.पाटील यांनी तपास पथकाचे अधिकारी व अंमलदार यांना मार्गदर्शन करुन सुचना दिल्या. त्यानुसार तपास पथकाचे अधिकारी व पोलीस अंमलदार मितेश चोरमोले, अभिनय चौधरी, सागर बोरगे, अवधुत जमदाडे यांनी तांत्रिक विश्लेषनाव्दारे पांढरे रंगाचे अॅक्टीव्हा दुचाकी गाडीवर एक संशयीत इसम दिसुन आला. त्या संशयीत इसमाचा शोध घेत असताना वर नमुद अंमलदार यांना आरोपी नामे समर्थ राजु कोंथीबिरे, वय २६ वर्षे, रा. निवृत्तीनगर, वडगाव बु, पुणे मुळ सोलापुर हा गुन्हयात वापरलेल्या दुचाकी गाडीवर लेकटाऊन भागात दिसुन आला. लागलीच त्यास ताब्यात घेवुन त्याचेकडे तपास करुन त्याचा नमुद गुन्हयामध्ये सहभाग असल्याचे निष्पन्न झाल्याने त्यास नमुद गुन्हयात अटक केले आहे. अटके दरम्यान आरोपीकडे तपास करता त्याने आणखीन सोन्याचा लक्ष्मीहार व दुचाकी गाडी चोरी केल्याचे कबुली दिली असुन त्याचेकडुन २,२५,०००/-रुपये किंमतीचे ३२ ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसुत्र व हार जप्त, तसेच दुचाकी गाडी जप्त केली आहे. आरोपीकडुन असे एकुण ३ गुन्हे उघडकीस आले आहेत.

सदरची कामगिरी मा.अपर पोलीस आयुकत, पश्चिम प्रादेशीक विभाग पुणे, श्री. प्रविणकुमार पाटील, मा. पोलीस उप आयुक्त परिमंडळ २, श्रीमती स्मार्तना पाटील, मा. सहाय्यक पोलीस आयुक्त स्वारगेट विभाग, पुणे श्रीमती नंदीनी वग्याणी, यांचे मार्गदर्शनाखाली भारती विदयापीठ पोलीस स्टेशन वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री.डी.एस. पाटील, पोलीस निरीक्षक (गुन्हे) शरद झिने, तपास पथकाचे अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक समीर कदम, पोलीस उपनिरीक्षक निलेश मोकाशी, पोलीस अंमलदार मितेश चोरमाले, अवधुत जमदाडे, सागर बोरगे, अभिनय चौधरी, सचिन सरपाले, शैलेश साठे, नामदेव रेणुसे, महेश बारवकर, चेतन गोरे, निलेश जमदाडे, हनमंत मासाळ, निलेश ढमढेरे, मंगेश पवार, सतिश मोरे, निलेश खैरमोडे, धनाजी धोत्रे, सचिन गाडे, विनोद कांबळे यांच्या पथकाने केली आहे.

Post a Comment

0 Comments