पुणे:-बिबवेवाडी येथी महेश सोसायटी चौकात महाविकासआघाडीचे गटार होडी आंदोलन, स्थानिक नागरिकांच्या अडचणी सोडवण्यासाठी, रामविलास माहेश्वरी यांचा पुढाकार.

पुणे :- आज रोजी दिनांक - २६ ऑगस्ट २०२४ पर्वती विधानसभा मतदार संघात, महाविकासआघाडी व बिबबेवाडी अप्पर-इंदिरा नगर परिसर व रामविलास माहेश्वरी यांच्या संयुक्त विद्यमानाने, महेश सोसायटी चौक येथील सांडपाणी पावसाळी गटार व ड्रेनेज लाईन गेल्या ५ ते ६ वर्षापासून वारंवार सांगून पत्र व्यवहार करून पुणे महानगरपालिकेचे अधिकारी व स्थानिक प्रशासन जाणून- बुजून दुर्लक्ष करत आहे. त्यांना गटार होडी आंदोलनाद्वारे इशारा देण्यात आला.
रामविलास माहेश्वरी म्हणाले की पुणे महानगरपालिकेला वारंवार सांगून देखील त्यांच्याकडून कुठलेही यासंदर्भात काम केले जात नाही आत्ताच काही दिवसापूर्वी पालिकेचे अधिकारी यांच्यासोबत बैठक्या झाल्या त्यावेळेस त्यांनी सांगितले लवकरात लवकर आम्ही हे सर्व काम करून घेऊ,  या संदर्भात या चेंबरचे काम  झालेलं नाही या परिसरामध्ये दुर्गंधी पसरले असून ड्रेनेज मधून बाहेर पडणारे सांडपाणी यामुळे येथील नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे, येथील परिस्थिती महानगरपालिका व बिबेवाडी क्षेत्रीय कार्यालय यांच्या अधिकाऱ्यांना माहिती असून देखील जाणून- बुजून दुर्लक्ष केले जात आहे,
स्थानिक नागरिकांच्या समस्या ऐकून महाविकास आघाडी यांच्याकडून, गटार होडी आंदोलन करण्यात आले.

याप्रसंगी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष मा. श्री .मोहनदादा जोशी व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस मा. अभयजी छाजेड, उबाठा शिवसेना गटाचे श्री बाळासाहेब ओसवाल व राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे श्री नितीन भैया कदम तसेच द. स .पुळेकर ,जयकुमार ठोंबरे पाटिल, रफिकभाई अलमेल व आम आदमी पार्टीचे  घनश्याम दरेकर,इतर पदाधिकारी सहभागी स्थानिक लोकप्रतिनिधी आंदोलनात सामील होते.प्रस्ताविक द.स.पुळेकर यांनी केले व आभार प्रदर्शन रफिकभाई अलमेल यांनी केले.

Post a Comment

0 Comments