येरवडा कारागृहातून पळून गेलेल्या आरोपीला मार्केटयार्ड पोलिसांकडून अटक, आरोपीला खुनाच्या गुन्हयात जन्मठेपेची शिक्षा झाली होती.

पुणे क्राईम बीट:- येरवडा कारागृहातून पळून गेलेल्या आरोपीला मार्केट यार्ड पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे, या संदर्भात अधिक माहिती अशी की मार्केट यार्ड येथे २१ ऑगस्ट भारत बंदच्या अनुषंगाने मार्केट यार्ड पोलीस स्टेशन येथील महिला पोलीस अंमलदार वेदपाठक, डोळसे, लोणकर हे मार्केट यार्ड परिसरातील शिवनेरी रोड ते वखार महामंडळ रोड पायी पेट्रोलिंग करीत होते, मार्केट यार्ड येतील गेट नंबर एक येथे एक व्यक्ती संशयीतरित्या उभा असलेला दिसुन आला त्यावेळी महिला पोलीस अंमलदार वेदपाठक यांनी त्यांचे मोबाईलवरील व्हॉटसअपवर प्राप्त झाले फोटो मधील मिळत्या जुळत्या वर्णनाचा व्यक्ती दिसल्याने, त्याला त्याचे नाव व पत्ता विचारले असता तो तिथून पळून जाऊ लागला  स्टाफच्या मदतीने त्याला ताब्यात घेऊन मार्केट यार्ड पोलीस स्टेशन येथे आणून त्याची चौकशी केली असता येरवडा कारागृहातून पळून गेलेला, आरोपी नामे राजु पंढरीनाथ दुसाने, वय ४३ वर्षे, रा मु.पो. महालगाव ता-वैजापुर जि. छत्रपती संभाजीनगर, असल्याचे समजले मार्केटयार्ड पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे.

वारजे पोलीस स्टेशन येथील खुनाच्या गुन्ह्यात आरोपीला जन्मठेपेची शिक्षा झाली होती, मा.अति सत्र न्यायालयने जन्मठेप व दंड ५ हजार/- न दिल्यास ३ महिने कारावासाची शिक्षा सुनावली असताना तो येरवडा खुले कारागृहातील कायदेशीर रखवालीतुन पळुन गेला होता.

सदर बाबत सविस्तर माहिती अशी की,
२१ ऑगस्ट भारत बंदच्या बंदोबस्ताच्या अनुषंगाने वरिष्ठांचे आदेशाने महिला पोलीस अंमलदार वेदपाठक, लोणकर, डोळसे हे शिवनेरी रोड ते वखार महामंडळ रोड अशी पायी पेट्रोलिंग करीत असताना मार्केट यार्ड गेट नं. १ जवळील रिक्षा जवळ एक इसम संशयीतरित्या उभा असलेला दिसुन आला. त्यावेळी महिला पोलीस अंमलदार वेदपाठक यांनी त्यांचे मोबाईलवरील व्हॉटसअपवर प्राप्त झाले फोटो मधील मिळत्या जुळत्या वर्णनाचा इसम दिसुन आला. त्यावेळी त्याचे जवळ जावुन त्यास त्याचे नाव गाव पत्ता विचारले असता तो उडवा-उडवीची उत्तरे देवु लागला व पोलीसांना घाबरुन पळून जाण्याचा प्रयत्न करु लागला त्यावेळी त्यांनी सोबत असलेला स्टाफ सह थोड्याच अंतरावर जावुन त्यास ताब्यात घेवुन पोलीस स्टेशन येथे आणले. व त्यांचेकडे सखोल चौकशी केली. त्यावेळी त्यानी त्याचे नाव राजु पंढरीनाथ दुसाने असे सांगितले. असे नावाचा आरोपी येरवडा कारागृह मधुन पळुन गेले असल्याचे व्हॉटसअप वर माहिती प्राप्त असल्याने लागलीच सदरच्या बातमीची खात्री करण्याकरीता येरवडा पोलीस स्टेशन येथे फोन करुन माहिती घेतली असता त्याचे विरुध्द येरवडा पोलीस स्टेशन येथे गु.र.नं.५३०/२०२४ बीएनएस २०२३ चे कलम २६२ गुन्हा दाखल आहे. व तो वारजे पोलीस स्टेशन गु.र.नं.३५/२०१५ भा.द.वि.क. ३०२, मधील आरोपी नामे राजु पंढरीनाथ दुसाने, वय ४३ वर्षे, रा मु. पो. महालगाव ता. वैजापुर जि. छत्रपती संभाजीनगर यास मा.अति सत्र न्यायालय पुणे सेशन केस क्रमांक ३४३/२०२५, दि.२४/०२/२०२४ रोजी जन्मठेप व दंड ५०००/- न दिल्यास ०३ महिने कारावासाची शिक्षा सुनावली असताना तो येरवडा खुले कारागृहातील कायदेशीर रखवालीतुन पळुन गेला म्हणुन गुन्हा दाखल केला आहे. आरोपीची वैदयकीय तपासणी करुन त्यास सुरक्षित येरवडा पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे.

सदरची कारवाई, मा. अप्पर पोलीस आयुक्त, पुणे शहर श्री. प्रविणकुमार पाटील, मा. पोलीस उप आयुक्त, परिमंडळ ०५ पुणे, श्री. आर. राजा, मा. सहा पोलीस आयुक्त, वानवडी विभाग श्री. धन्यकुमार गोडसे यांचे मार्गदर्शनाखाली मार्केट यार्ड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीमती माया देवरे यांचे आदेशाने महिला पोलीस अंमलदार वेदपाठक, लोणकर, डोळसे यांनी केली.

Post a Comment

0 Comments