पुणे क्राईम बीट:-दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक १, गुन्हे शाखा, येथील पोलीस पुणे शहरांमध्ये चोरीच्या वाहनांचा शोध घेत असताना बातमी मिळाली की, रामनगर, वारजे माळवाडी, पुणे येथे एक मुलगा चोरीची दुचाकी गाडी घेऊन उभा आहे, सदर मुलाकडे गाडी आहे ती चोरीची आहे अशी खात्रीशीर बातमी मिळाल्याने बातमीच्या ठिकाणी जाऊन सापळा रचुन नमुद मुलाचे ताब्यात मिळुन आलेल्या मोटार सायकलीची माहिती काढली व गुन्हे अभिलेखावरील अभिलेख पाहता सदर मोटार सायकल बाबत वरील प्रमाणे गुन्हा नोंद असलेबाबत माहिती समजल्याने नमुद विधीसंघर्षग्रस्त बालकाकडे त्याचे पालकां समक्ष दरोडा व वाहनचोरी विरोधी पथकाकडील पोलिसांनी चौकशी करता त्याने ३ ऑटो रिक्षा व ५ दुचाकी गाडया चोरी केल्याचे सांगितल्याने नमुद विधीसंघर्षग्रस्त बालकाकडुन एकुण ८ वाहने जप्त करुन वाहनचोरीचे गुन्हे उघडकीस आणले आहेत.
अधिक माहिती अशी की,
मा. पोलीस आयुक्त, पुणे शहर यांनी पुणे शहरामध्ये दुचाकी वाहनांचे चोरीला आळा बसावा याकरीता विशेष मोहिम राबवुन कारवाई करणेबाबत आदेश दिले होते. त्या अनुषंगाने दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक १ कडील पोलीस अधिकारी व अंमलदार असे वारजे माळवाडी पोलीस स्टेशन कडील गुन्हा रजि नं. ३१२/२०२४, भारतीय न्याय संहिता कलम ३०३ (२) या गुन्हयातील अज्ञात आरोपीताचा व चोरीस गेले दुचाकी गाडीचा शोध घेत असताना पोलीस अंमलदार साईकुमार कारके यांना त्यांचे गोपनीय बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, रामनगर, वारजे माळवाडी, पुणे येथे असलेल्या मोकळ्या मैदानाजवळ एक मुलगा नमुद गुन्हयातील चोरीस गेली दुचाकी गाडीसह उभा असुन सदरची गाडी ही चोरीची असलेबाबतची बातमी मिळाल्याने सदर ठिकाणी जावुन सापळा रचुन नमुद मुलाचे ताब्यात मिळुन आलेल्या मोटार सायकलीची माहिती काढली व गुन्हे अभिलेखावरील अभिलेख पाहता सदर मोटार सायकल बाबत वरील प्रमाणे गुन्हा नोंद असलेबाबत माहिती समजल्याने नमुद विधीसंघर्षग्रस्त बालकाकडे त्याचे पालकां समक्ष आणखीन चौकशी करता त्याने ३ ऑटो रिक्षा व ५ दुचाकी गाडया_चोरी केल्याचे सांगितल्याने नमुद विधीसंघर्षग्रस्त बालकाकडुन एकुण ८ वाहने जप्त करुन वाहनचोरीचे गुन्हे उघडकीस आणले आहेत.
वरील नमुद विधीसंघर्षग्रस्त बालकाकडुन पुणे शहरातील ७ व शिक्रापुर पो.स्टे. पुणे ग्रामीण कडील १ असे एकुण ८ वाहन चोरीचे गुन्हे उघडकीस आणुन त्याचेकडुन किं. रु २,५०,०००/- चा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
सदरची कारवाई मा. पोलीस आयुक्त पुणे शहर श्री. अमितेश कुमार, मा. पोलीस सह आयुक्त श्री. रंजनकुमार शर्मा, मा.अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) श्री. शैलेश बलकवडे, मा. पोलीस उप आयुक्त गुन्हे, श्री. निखिल पिंगळे, मा. सहा. पोलीस आयुक्त गुन्हे शाखा १, श्री. गणेश इंगळे, मा. वरिष्ठ पोलीस निरीक्षक दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक-१, गुन्हे शाखा, श्री. नंदकुमार बिडवई यांचे मार्गदर्शनाखाली सहा. पोलीस निरीक्षक प्रविण काळुखे, पोलीस अमंलदार बाळु गायकवाड, प्रदीप राठोड, धनंजय ताजणे, गणेश ढगे, रविंद्र लोखंडे, साईकुमार कारके, महेश पाटील, श्रीकांत दगडे, शिवाजी सातपुते, नारायण बनकर, यांनी केली आहे.
0 Comments