पुणे शहरामध्ये चोरी करणाऱ्या रेकॉर्डवरील आरोपीला कोंढवा तपास पथकाने अटक केली आहे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनय पाटणकर यांनी कोंढवा पोलीस स्टेशन हद्दीमध्ये झालेल्या चोरीच्या गुन्ह्याचा तपास करण्यासाठी पोलिसांना सूचना दिल्या होत्या त्याच अनुषंगाने पोलिसांना माहिती मिळाली की सदर गुन्ह्यातील आरोपी हा काशेवाडी भवानी पेठ या भागामध्ये राहत आहे, कोंढवा पोलिसांनी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली काशेवाडी भवानी पेठ येथे जाऊन आरोपीला सापळा रचून अटक केली आहे, पोलिसांनी अधिक तपास केला असता, आरोपी अमोल अवचरे रा. कासेवाडी, भवानी पेठ, आरोपीने त्याच्या साथीदारासोबत मिळून दुकानांची शटर उचकटुन चोरी केल्याचे कबूल केले आहे. कोंढवा पोलीस स्टेशन येथील २ गुन्हे. सिंहगड रोड पोलीस स्टेशन येथील १ गुन्हे.
आरोपीवर यापुर्वीचे एकुण १६ गुन्हे नोंद आहेत.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार,
दि.०९/०८/२०२४ रोजी कोंढवा पोलीस स्टेशनचे तपास पथकाचे पोलीस अधिकारी व अंमलदार हे हद्दीमध्ये घरफोडी तसेच चोरीच्या घटनांच्या अनुषंगाने पेट्रोलिंग करत असताना पोलीस अंमलदार संतोष बनसुडे व शाहिद शेख यांना त्यांचे बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, कोंढवा पोलीस स्टेशन, पुणे शहर गु.रजि.नं. ९४०/२०२४ भा.न्या.सं. अधिनियम कलम ३३१ (४), ३०५ हा गुन्हा पोलीस रेकॉर्ड वरील आरोपी नामे अमोल अवचरे रा. कासेवाडी, भवानी पेठ, पुणे याने व त्याचा साथीदार नामे तौसिफ रा. कोंढवा, पुणे यांनी मिळून केलेला आहे अशी खात्रीलायक बातमी मिळाली.
सदर बातमीप्रमाणे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, श्री. विनय पाटणकर, यांचे आदेशाने पोउपनि बालाजी डिगोळे व स्टाफ असे आरोपी नामे अमोल अवचरे रा. कासेवाडी, भवानी पेठ, पुणे याचा शोध घेणेकामी कासेवाडी, भवानी पेठ, पुणे येथे गेले असता सदर कासेवाडी परिसरात आरोपीचा शोध घेत असताना आरोपी अमोल अवचरे हा त्याच्याकडील काळ्या रंगाच्या होंडा डिओ दुचाकी गाडी क्र. एम.एच/१२/एन.आर/६२४० हिचेवरुन जाताना दिसुन आला. त्यावेळी सदर इसम हाच आरोपी अमोल अवचरे असल्याचे समजले त्याप्रमाणे लागलीच पोलीस स्टाफने त्यास पाठलाग करुन कासेवाडी लगत असलेल्या जैन मंदीराचे समोरील सार्वजनिक रोडवर थांबवुन त्यास त्याचे नाव पत्ता विचारता त्याने त्याचे नाव अमोल किसन अवचरे, वय २७ वर्षे, रा. कॉलनी नंबर १० समोर, म्हसोबा मंदीरा शेजारी, कासेवाडी, भवानी पेठ, पुणे असे असल्याचे सांगितले. त्यास त्याचेकडे असलेल्या दुचाकी गाडीबाबत तसेच गुन्ह्याबाबत तपास केला असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिल्याने त्यास ताब्यात घेवुन त्यास कोंढवा पोलीस स्टेशन येथे आणुन त्यास विश्वासात घेवुन त्याचेकडे तपास करता त्याने सदरचा गुन्हा हा त्याचा साथीदार नामे तौसिफ रा. कोंढवा, पुणे याचेसह केला असल्याचे सांगितले. तसेच सदर गुन्हा करताना त्याच्याकडे असलेली होंडा कंपनीची डिओ दुचाकी गाडी क्र. एम.एच/१२/एन. आर/६२४० ही वापरली असल्याचे सांगितल्याने सदर २५,०००/- रु. किं.ची होंडा डिओ दुचाकी, तसेच सदर गाडीच्या डिकीमध्ये १००/- रु. किं.चा एक धारदार लोखंडी कोयता, तसेच गुन्ह्यातील चोरीस गेलेल्या मुद्देमालापैकी एक ५,०००/- रु. किं.ची १०० ग्रॅम वजनाची श्री कृष्णाची चांदीची मुर्ती त्यास सोनेरी पॉलिश केलेली तसेच १३,५००/- रु. किं.ची एकुण २७ नग चांदीचे नाणे मिळुन आले आहे.
सदर आरोपीस दाखल गुन्ह्यात अटक करुन त्याचेकडे अटक मुदतीत तपास करुन त्याने व त्याचा साथीदार तौसिफ शेख रा. कोंढवा, पुणे तसेच यश गायकवाड रा. कासेवाडी, पुणे यांनी कोंढवा पोलीस स्टेशन हद्दीत व सिंहगड पोलीस स्टेशन हद्दीत शटर उचकटुन चोरी केल्याचे मान्य केल्याने त्यांचेकडुन खालीलप्रमाणे आणखीन शटर उचकटुन चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्यात कोंढवा तपास पथकास यश आले आहे.
१) कोंढवा पोलीस स्टेशन गु.रजि.नं. ८३७/२०२४ भा.न्या.सं. कलम ३३१(४), ३०५
२) कोंढवा पोलीस स्टेशन गु. रजि.नं. ८५३/२०२४ भा.न्या.सं. कलम ३३१ (४),३०५
३) सिंहगड पोलीस स्टेशन गु.रजि.नं. ४२३/२०२४ भा.न्या.सं. कलम ३३१(३),३३१ (४),३०५
सदर आरोपीकडुन वरील गुन्ह्यांतील मुद्देमाल त्यामध्ये सोन्याची वेढणी, चांदीचे कॉईन, मुर्ती व ब्रेसलेट, डिव्हीआर व इंटरनेट डिस्ट्रीब्युटर व एकुण ५ रेडमी कंपनीचे मोबाईल फोन असा एकुण १,१७,६००/- रु. किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
सदर आरोपी हा पोलीस रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार असुन त्याचेविरुद्ध यापुर्वीचे कोंढवा पोलीस स्टेशन येथे २, खडक पोलीस स्टेशन येथे ४, लष्कर पोलीस स्टेशन येथे ३, स्वारगेट पोलीस स्टेशन येथे ३, येरवडा, लोणीकंद, चंदननगर, पिंपरी येथे प्रत्येकी १ असे यापुर्वीचे एकुण १६ गुन्हे नोंद आहेत.
वरील नमुद कारवाई, मा. पोलीस उप-आयुक्त परि. ५, पुणे श्री. आर. राजा, मा. सहा. पोलीस आयुक्त, वानवडी विभाग, श्री.धन्यकुमार गोडसे, कोंढवा पोलीस स्टेशनचे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, श्री. विनय पाटणकर, पोलीस निरीक्षक गुन्हे श्री.मानसिंग पाटील, यांचे मार्गदर्शन व सुचनांप्रमाणे कोंढवा पोलीस स्टेशन येथील तपास पथकाचे पोलीस उप-निरीक्षक बालाजी डिगोळे, सपोनि लेखाजी शिंदे, पोलीस अंमलदार सतिश चव्हाण, विशाल मेमाणे, निलेश देसाई, पोलीस अंमलदार गोरखनाथ चिनके, शाहीद शेख, संतोष बनसुडे, लक्ष्मण होळकर, सुजित मदन, सुरज शुक्ला, सागर भोसले यांच्या पथकाने केली.
0 Comments