पुणे क्राईम बीट:-लोणीकंद पोलीस स्टेशनच्या हद्दीमधील आरोपीला तडीपार करण्यात आले आहे,
सदर आरोपीकडून बेकायदेशीररित्या गावठी हातभट्टीची दारु विक्री करणे, लोकांना तसेच सामान्य नागरीकांना वारंवार त्रास देणे, लोकांच्या जिवीतास धोका निर्माण करणारा सराईत गुन्हेगाराच्या कृत्यामुळे लोकांच्या मनातुन कायद्या विषयी संभ्रम निर्माण होवु नये तसेच सदर सराईत गुन्हेगारावर कायद्याचा वचक बसावा या उद्देशाने, शामकांत विष्णु सातव, वय ३९ वर्षे, रा. आव्हाळवाडी रोड डोमखेल वस्ती वाघोली, याला संपुर्ण पुणे जिल्ह्यातुन दीड वर्षाकरीता (१८ महिने) तडीपार केले आहे.
सदरचे तडीपार इसम हा पुणे जिल्ह्याचे परिसरात आढळुन आल्यास त्याची माहीती लोणीकंद पोलीस स्टेशन पुणे शहर संपर्क क्र. ९५२७०६९१०० यावर कळविण्याचे आवाहन लोणीकंद पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, श्री पंडीत रेजितवाड यांनी केले आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार.
लोणीकंद पोलीस स्टेशन हद्दीत वारंवार गावठी हातभट्टी दारुविक्री करणारा सराईत गुन्हेगार शामकांत विष्णु सातव, वय ३९ वर्षे, रा. आव्हाळवाडी रोड डोमखेल वस्ती वाघोली ता. हवेली जि. पुणे यास पोलीस उपायुक्त परिमंडळ ०४, पुणे शहर यांनी महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ५६ (१) (अ) (ब) प्रमाणे संपुर्ण पुणे जिल्ह्यातुन अनुक्रमे दीड वर्षाकरीता (१८ महिने) तडीपार केले आहे.
लोणीकंद पोलीस स्टेशन हद्दीतील आव्हाळवाडी, वाघोली तसेच आसपासच्या भागात दहशत निर्माण करुन लोकांना तसेच सामान्य नागरीकांना वारंवार त्रास देणारा, बेकायदेशीररित्या गावठी हातभट्टीची दारु विक्री करुन लोकांचे जनजीवन धोक्यात आणणारा व लोकांमध्ये दहशत करुन लोकांच्या जिवीतास धोका निर्माण करणारा सराईत गुन्हेगाराच्या कृत्यामुळे लोकांच्या मनातुन कायद्या विषयी संभ्रम निर्माण होवु नये तसेच सदर सराईत गुन्हेगारावर कायद्याचा वचक बसावा या उद्देशाने सदर इसमावर मा. सहा. पोलीस आयुक्त येरवडा विभाग श्रीमती प्रांजली सोनवणे, लोणीकंद पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंडीत रेजितवाड यांचे मार्गदर्शनाखाली, सहा. पोलीस निरीक्षक रविंद्र गोडसे, ग्रेड पोलीस उप निरीक्षक दत्तात्रय झुरुंगे, पोलीस अंमलदार यांनी सदर सराईत इसम याचेवर दाखल गुन्ह्यांचा अभिलेख तपासुन सदर इसम यांस महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ५६ प्रमाणे तडीपार करणेबाबत पोलीस उपायुक्त श्री. विजयकुमार मगर यांना प्रस्ताव पाठविला असता, श्री. विजयकुमार मगर यांनी सदर सराईतास पुणे जिल्ह्याचे हद्दीतुन अनुक्रमे दीड वर्षाकरीता तडीपार कारवाई केली आहे.
सदरची कामगिरी तत्कालीन मा. पोलीस उपआयुक्त परि-४ श्री. विजयकुमार मगर, मा. सहा. पोलीस आयुक्त. येरवडा विभाग श्रीमती प्रांजली सोनवणे, लोणीकंद पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. पंडीत रेजितवाड यांचे मार्गदर्शनाखाली सहा. पोलीस निरीक्षक रवींद्र गोडसे, पोलीस उप निरीक्षक दत्तात्रय झुरुंगे, पोलीस अंमलदार प्रशांत कापुरे, सागर कडु, शुभम सातव यांनी केली आहे.
0 Comments