स्वारगेट पोलीस स्टेशन व पुणे शहर हद्दीमधील एसटी स्टॅन्ड व पीएमपीएल बस स्टॅन्ड व अन्य गर्दीच्या परिसरामध्ये अज्ञात चोरटे हे नागरिकांचे मोबाईल गर्दीचा फायदा घेवुन मोबाईल चोरी करीत असल्याच्या घटना वारंवार घडत असल्याने मा. पोलीस उपायुक्त, स्मार्तना पाटील,यांनी स्वारगेट पोलीस ठाणे, भेटी दरम्यान सूचना दिल्या होत्या.
दरम्यानचे काळात मोबाईल चोरी बाबत स्वारगेट पोलीस स्टेशन गुन्हा रजिनं. २४४/२०२४ भादंवि कलम ३७९ दाखल करण्यात आला होता. सदर अज्ञात चोरटयाचा शोध घेणेबाबत मा. वरिष्ठ पोलीस निरीक्षक स्वारगेट पोलीस स्टेशन यांनी स्वारगेट पोलीस स्टेशन कडील तपास पथकातील अधिकारी व अंमलदार यांना आदेशित केले होते.
त्यावरुन तात्काळ स्वारगेट पोलीस स्टेशन कडील तपास पथकाचे सहा. पोलीस निरीक्षक प्रशांत संदे, पोलीस उपनिरीक्षक अशोक येवले व तपास पथकातील पोलीस अंमलदार हर्षल शिंदे, फिरोज शेख व सुजय पवार यांनी स्वारगेट एसटी स्टॅन्ड परीसरातील सी.सी.टी.व्ही. फुटेज तपासुन तांत्रीक विश्लेषनाद्वारे मिळालेल्या माहितीच्या आधारे वर्कआऊट करुन स्वारगेट एसटी स्टॅन्ड परीसरात वारंवार पेट्रोलिंग करीत असताना पोलीस अंमलदार हर्षल शिंदे, फिरोज शेख व सुजय पवार यांना त्यांचे खास बातमीदारामार्फत बातमी मिळाली की एक इसम हा स्वारगेट एसटी स्टॅन्ड मध्ये संशयितरित्या फिरत आहे अशी बातमी मिळाल्याने सदर बातमीबाबत वरिष्ठांना माहिती दिली असता वरिष्ठांनी कायदेशीर कारवाई करणेबाबत आदेशित केले होते. त्यावरुन तपास पथकातील वर नमुद अधिकारी व अंमलदार यांनी बातमीचे ठिकाणी जावुन सापळा रचून थांबले असता मिळालेल्या बातमीप्रमाणेच एका इसमाच्या हालचाली संशयास्पद वाटल्याने सदर इसमास ताब्यात घेवुन त्यांचेकडे चौकशी केली असता त्याने त्याचे नाव १) इम्रानताज शेख, वय ३१ रा. कोंढवा पुणे असे सांगितले त्यास स्वारगेट पोलीस स्टेशन येथे आणुन कसुन चौकशी केली असता त्याने स्वारगेट परिसरामध्ये १०० ते १५० मोबाईल चोरी केले असल्याचे सांगितले त्यास दाखल गुन्हयात अटक करुन त्याचेकडे तपास केला असता त्याने सदर मोबाईल २) ऊसामा शफिक शेख, वय २२ वर्ष, रा.सय्यदनगर, हडपसर पुणे मुळ रा. घनसांवगी जि. जालना यास विक्री केले असल्याचे सांगितले तसेच आरोपी नामे इम्रान शेख याचे पुर्व रेकॉर्ड तपासले असता त्याचेवर चोरीचे एकुण १० गुन्हे दाखल असल्याची माहिती मिळाली आहे.
तनंतर ऊसामा शेख याचा शोध घेवुन त्यास अटक केली असता त्याने सदर मोबाईल खरेदी करुन त्याचेवर सॉफ्टवेअर मारुन सदर मोबाईल पुढे मुंबई येथील एजंट आरोपी ३) आबिद मुकीम पटेल वय २३ वर्षे रा. प्लॉट मालाड मालवणी मुंबई व ४) अख्तर अली रबियलखान वय ३४ वर्षे रा. पहिला मजला एनसीसी प्लॉट नं ५९ गेट नं ७ मालवणी मालाड वेस्ट मुळ रा-चेतन्यपुर जि. बदनापुर पश्चिम बंगाल यांना विक्री केले असल्याचे सांगितले तद्नंतर मुंबई येथे जावुन सदर आरोपींचा शोध घेवुन त्यांना दाखल गुन्हयात अटक करुन सदर आरोपीतांकडुन एकुण १२ लाख रुपये किंमतीचे एकुण १२० वेगवेगळया कंपन्यांचे मोबाईल फोन व ०१ लाख रुपये किंमतीचे वेगवेगळया कंपनीचे ०३ लॅपटॉप तसेच सॉफ्टवेअर मारण्याचे एकुण ०३ डिव्हाईस असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
आरोपी क्रं.१ याचा मोबाईल चोरीबाबत अभिलेख असुन वेगवेगळ्या पोलीस स्टेशन येथेएकुण १० गुन्हे दाखल आहेत. आरोपी क्रं.२ याने यापुर्वी चोरीचे मोबाईल घेतलेबाबत गुन्हा दाखल आहे. आरोपी क्रं.३ व ४ हे पहील्यांदा अभिलेखावर आलेले आहेत.
सदर गुन्हयांमध्ये आणखीन ३ पाहिजे आरोपी असुन सदर आरोपीतांची मोठी आंतरराजीय टोळी असल्याचे तपासामध्ये निष्पन्न झाले आहे. नमुद टोळी ही नागरिकांचे मोबाईल चोरुन पॅटर्न लॉक असतील तर ते सॉफ्टवेअर मारुन उघडुन त्यातील सिमकार्ड फेकुन देतात व मोबाईलचे स्पेअर्स स्पार्ट वेगवेगळे करुन विकतात. आरोपींनी आतापर्यंत किती मोबाईलचे स्पेअर्स स्पार्ट विकले व कोणकोणते व्यापारी असे स्पेअर्स स्पार्ट विकत घेतलेले आहेत याबाबत अधिक तपास चालु आहे.
सदरची कामगिरी ही मा. अप्पर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशिक विभाग, पुणे शहर, श्री प्रविणकुमार पाटील, मा.पोलीस उप-आयुक्त, परिमंडळ २, पुणे शहर, श्रीमती स्मार्तना पाटील, मा. सहा. पोलीस आयुक्त, स्वारगेट विभाग, पुणे शहर श्रीमती नंदिनी वग्यानी, यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक स्वारगेट पोलीस स्टेशन पुणे शहर, श्री. दिलीप फुलपगारे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) मा.गीता बागवडे यांच्या आदेशान्वये तपास पथकातील सहा. पोलीस निरीक्षक प्रशांत संदे, सहा. पोलीस निरीक्षक चांगदेव सजगणे, पोलीस उपनिरीक्षक अशोक येवले, पोलिस अमंलदार संदीप गोडसे, नितीन क्षिरसागर, सागर काळे, हर्षल शिंदे, फिरोज शेख, सुजय पवार, संदीप घुले, रमेश चव्हाण, प्रविण गोडसे यांनी एकत्र मिळुन केली आहे.
0 Comments