बिबवेवाडी येथील भारत ज्योती बस स्टॉप येथील फिर्यादी महिलेला, आरोपी महिलेने तुम्हाला घरकाम देतो असे सांगून महिलेला
लक्ष्मी रोड येथे घेवुन जावुन तिथुन तिचे घरी नेवुन फिर्यादी यांना चहामध्ये गुंगीचे औषध देऊन बेशुद्ध करुन फिर्यादी महिलेचे अंगावरील सोन्याचे दागीने व मोबाईल हे जबदस्तीने काढुन घेवून त्याना फुरसुंगी येथे बेशुध्द अवस्थेत सोडून दिले, तसेच आणखी एक महिलेला सुद्धा आरोपी महिलेने काम देण्याच्या बहाण्याने, स्कुटीवरून घरी नेवून चहा मधून गुंगीकारक पदार्थ देवून त्यांचे गळयातील व कानातील सोन्याचे दागिने काढून घेवून त्यांना कर्वेनगर पुणे येथे बेशुध्द अवस्थेत सोडून दिले म्हणून,
फिर्यादी महिलांनी दिलेल्या तक्रारीवरून आरोपी महिलेवर बिबवेवाडी पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर गुन्ह्यामध्ये आरोपी महिलेचा शोध घेण्यासाठी बिबवेवाडी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनय पाटणकर व पोलीस निरीक्षक गुन्हे मनोजकुमार लोंढे यांनी पोलिसांना मार्गदर्शन केले, आणि तपास पथक नेमून आरोपी महिलेचा शोध घेण्यासाठी सूचना दिल्या, या संदर्भात बिबवेवाडी पोलिसांनी अंदाजे ५० ते ६० सीसीटीव्ही कॅमेरे चेक करून सराईत आरोपी महिला, सुषमा बाळासो भोसले रा. माळेगाव बुद्रुक बारामती जि. पुणे. व त्याचा एक साथीदार, विकास वासूदेव पाठक, वय ५८ वर्षे रा.एलआयसी स्टाफ क्वार्टर गणेशखिंड रोड मॉडेल कॉलनी शिवाजीनगर पुणे. मुळ राहणार नाईकवडी प्लॉट परांडा रोड, बार्शी. यांना अटक करून तपास केला असता त्यांनी गुन्हा केल्याचे कबूल केले आहे.
दोन्ही आरोपीकडे तपास करून गुन्हयातील २ लाख, ४ हजार, रूपये किमंतीचे सोन्याचे दागिने, मोटर सायकल, मोबाईल असा मुद्देमाल जप्त केला आहे.
सदरबाबत अधिक माहिती अशी की, दिनांक १२/०६/२०२४ रोजी दुपारी १२.३० वा ते रात्री १०.३० वा चे दरम्यान एका अनोळखी महिलेने भारत ज्योती बसस्टॉप बिबवेवाडी येथे फिर्यादी यांना भेटून त्यांना काम देण्याचा बहाणा करुन त्यांना लक्ष्मी रोड येथे घेवुन जावुन तिथुन तिचे घरी नेवुन फिर्यादी यांना चहामधुन गुंगीकारक पदार्थ देवुन बेशुद्ध करुन त्यांचे अंगावरील सोन्याचे दागीने व मोबाईल हे जबदस्तीने काढुन घेवून त्याना फुरसुंगी येथे बेशुध्द अवस्थेत सोडून दिले तसेच साक्षीदार महिला यांना सुध्दा अनोळखी महिलेने काम देते असे सांगून स्कुटीवरून घरी नेवून चहा मधून गुंगीकारक पदार्थ देवून त्यांचे गळयातील व कानातील सोन्याचे दागिने काढून घेवून त्यांना कर्वेनगर पुणे येथे बेशुध्द अवस्थेत सोडून दिले म्हणून फिर्यादी यांनी नमुद अनोळखी महिलेविरूध्द तक्रार दिलेने बिबवेवाडी पोलीस ठाणे गुन्हा रजि.१५४/२०२४ भा.दं.वि.सं. कलम ३२८, ३९२, ३६३ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
दाखल गुन्हयातील अनोळखी महिला आरोपीचा वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनय पाटणकर व पोलीस निरीक्षक गुन्हे मनोजकुमार लोंढे, यांचे मार्गदर्शनाखाली तपासपथक प्रमुख सहा. पोलीस निरीक्षक प्रविण काळुखे, तपासपथकातील अमंलदार यांनी गुन्हयाचे घटनाठिकाणापासून ते अनोळखी आरोपी गेलेल्या मार्गावरील अंदाजे ५० ते ६० सीसीटीव्ही कॅमेरे चेक करून तांत्रिक विश्लेषणाचे मदतीने आरोपी नामे १) सुषमा बाळासो भोसले रा. माळेगाव बुद्रुक बारामती जि. पुणे. २) विकास वासूदेव पाठक, वय ५८ वर्षे रा.एलआयसी स्टाफ क्वार्टर गणेशखिंड रोड मॉडेल कॉलनी शिवाजीनगर पुणे.. मुळ नाईकवडी प्लॉट परांडा रोड, बार्शी. यांना निष्पन्न करून तपास करता त्यांनी दिनांक १२/०६/२०२४ रोजी फिर्यादी यांना काम देण्याचा बहाण करून आरोपी विकास पाठक याचे घरी नेवून त्यांना गुंगीचे औषध देवून त्यांचे अंगावरील दागिने व मोबाईल काढून घेवून त्यांना दोघांनी वरील नमुद मोपेड गाडीवरून बेशुध्द अवस्थेत फुरसुंगी येथे सोडून दिले व यातील साक्षीदार आशा मळेकर यांना दिनांक १०/०६/२०२४ रोजी नमुद आरोपी महिलेने त्यांना काम देण्याचे बहाण्याने त्यांना घरी नेवून त्यांना गुंगीचे औषध देवून त्यांचे अंगावरील दागिने व मोबाईल काढून घेवून त्यांना दोघांनी वरील नमुद मोपेड गाडीवरून बेशुध्द अवस्थेत कर्वेनगर पुणे येथे सोडून दिले. नमुद दोन्ही आरोपीकडे तपास करून गुन्हयातील २,०४,०००/-रूपये किमंतीचे सोन्याचे दागिने, मोटर सायकल, मोबाईल हस्तगत करून गुन्हा उघडकीस आणलेला आहे. वरीलप्रमाणे कोणासोवत प्रकार घडला असलेस त्यांनी बिबवेवाडी पोलीस ठाणेस संपर्क करावा. दाखल गुन्हयाचा पुढील तपास सहा. पोलीस निरीक्षक प्रविण काळुखे हे करीत आहेत.
सदरची कामगिरी मा. पोलीस आयुक्त श्री अमितेशकुमार, मा. सह पोलीस आयुक्त श्री प्रविण पवार, मा. अप्पर पोलीस आयुक्त श्री मनोज पाटील, मा. पोलीस उप आयुक्त श्री आर राजा, परिमंडळ ५ पुणे शहर, मा. सहा. पोलीस आयुक्त श्री गणेश इंगळे, वानवडी विभाग पुणे शहर यांचे मार्गदर्शनाखाली, वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री विनय पाटणकर, पोलीस निरीक्षक गुन्हे श्री मनोजकुमार लोंढे, तपासपथकाचे प्रभारी अधिकारी सहा. पोलीस निरीक्षक श्री प्रविण काळुखे, पोलीस हवालदार संजय गायकवाड, शाम लोहोमकर, संतोष जाधव, पोलीस अमंलदार शिवाजी येवले, प्रणय पाटील, विशाल जाधव, आशिष गायकवाड, ज्योतिष काळे, अभिषेक धुमाळ, मेघा
0 Comments