पुणे महानगरपालिकेची प्लास्टिक पिशव्या बंदी विरोधात कारवाई, १० हजाराचा दंड वसूल.

पुणे शहरातील अनेक दुकानांमध्ये व फेरीवाले छोटे मोठे व्यावसायिक यांच्याकडे मोठ्या प्रमाणात प्लास्टिकचे पिशव्या वापरण्यात येतात, पुणे महानगरपालिकेकडून प्लास्टिक पिशव्यांवर बंदी असताना देखील, बऱ्याच ठिकाणी दुकानदार व्यापारी यांच्याकडून खुलेआम प्लास्टिक विक्री व पुरवठा केला जातो, अशा दुकानदार व्यापारी व छोटे मोठे व्यावसायिक यांच्यावर अनेक वेळा महानगरपालिकेची कारवाई केली जाते, आणि त्यांच्याकडून दंड देखील वसूल केला जातो तरी देखील पुणे शहरांमध्ये, प्लास्टिकच्या पिशव्या मोठ्या प्रमाणात वापरल्या जातात असे दिसून येते,

यासंदर्भात पुणे महापालिकेने स्थापन केलेल्या
केंद्रीय प्लास्टिक पथकाने प्लास्टिक विरोधात आज दिनांक २७/०६/२०२४, बंदी असलेल्या प्लास्टिकच्या पिशव्या वर कारवाई केली आहे यातून अंदाजे ३०० कि. प्लास्टिकच्या पिशव्या जप्त करून, प्लास्टिकच्या पिशव्या,प्लास्टिक जप्त करून १० हजार, रुपयाचा दंड करण्यात आला आहे. यापुढे देखील अशीच कारवाई पुणे महानगरपालिकेकडून केली जाईल, अशी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून माहिती मिळाली.

पुणे महानगरपालिका घनकचरा व्यवस्थापन विभाग उपायुक्त मा. संदीप कदम, तसेच डॉ. केतकी घाडगे सहाय्यक आरोग्य अधिकारी पुणे महानगरपालिका आणि प्रमुख आरोग्य निरीक्षक आय.एस. इनामदार, यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य निरीक्षक शाहु पोकळे, उमेश देवकर,राजेश रासकर, अमोल पवार, जालिंदर चांदगुडे, यांच्याकडून कारवाई करण्यात आली आहे.

Post a Comment

0 Comments