पुणे - भारती विद्यापीठ पोलिसांची कामगिरी, सोन्याच्या दुकानात चोरी करणाऱ्या आरोपीला अटक, आरोपीकडून, ५ लाख रुपयांचे ७ तोळे वजनाचे दागिने जप्त.

भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये असलेल्या जांभूळवाडी गवळीवाडा आंबेगाव खुर्द येथील, सोन्याच्या दुकानात चोरी झाल्याच्या संदर्भात गुन्हा दाखल करण्यात आला आहे,गुन्ह्याचा तपास पोलीस करत असताना पोलिसांना माहिती मिळाली की दत्तनगर जांभूळवाडी येथील सोन्याच्या दुकानात चोरी करणारा आरोपी हा धायरी रायकर मळा येथे थांबला आहे अशी खात्रीशीर माहीती मिळाली,पोलिसांनी आरोपीला सदर ठिकाणाहून अटक करून पोलीस स्टेशनमध्ये आणून चौकशी केली असता आरोपीकडून, ५ लाख रुपयांचे ७ तोळे वजानाचे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार,
दिनांक १६/०६/२०२४ रोजी फिर्यादी यांचे दत्तनगर जांभुळवाडीरोड, गवळी वाडा, आंबेगाव खुर्द पुणे येथे दुकानातील सेल्समन नामे विवेक वंसत दाभोळकर वय ३१ रा. फ्लॅट नं.५, समर्थ अपार्टमेंट, जाधवनगर, रायकर मळा, धायरी, पुणे याने फिर्यादी यांचे दुकानातुन सोन्याचे दागिने चोरी केले म्हणुन भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन गुन्हा रजि नंबर ५१९/२०२४, भादंवि कलम ३८१ अन्वये गुन्हा दाखल आहे.

दाखल गुन्हयातील आरोपी विवेक दाभोळकर याचा शोध घेत असताना पोलीस अंमलदार धनाजी धोत्रे, सचिन गाडे यांना सदरचा आरोपी हा धायरी रायकर मळा येथे थांबला आहे अशी खात्रीशीर माहीती मिळाली. त्यानुसार तपास पथकाचे पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांनी धायरी, रायकर मळा, जाधवनगर येथे जावुन नमुद आरोपीताचा शोध घेतला असता तो मिळुन आल्याने त्यास अटक करुन त्याचेकडुन ५ लाख रुपयांचे ७ तोळे वजानाचे सोन्याचे दागिने जप्त केले आहेत.

सदरची कामगिरी मा. पोलीस उप आयुक्त परिमंडळ २, श्रीमती स्मार्तना पाटील, मा. सहाय्यक पोलीस आयुक्त स्वारगेट विभाग, श्रीमती नंदीनी वग्याणी, यांचे मार्गदर्शनाखाली भारती विदयापीठ पोलीस स्टेशनकडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री डी. एस. पाटील, पोलीस निरीक्षक (गुन्हे) श्री. शरद झिने, तपास पथकाचे अधिकारी सहा. पोलीस निरीक्षक समीर कदम, पोलीस उपनिरीक्षक धिरज गुप्ता, पोलीस अंमलदार धनाजी धोत्रे, सचिन गाडे, सचिन सरपाले, शैलेश साठे, नामदेव रेणुसे, चेतन गोरे, महेश बारवकर, हनमंत मासाळ, निलेश ढमढेरे, मंगेश पवार, निलेश जमदाडे, सतिश मोरे, अवधुत जमदाडे, निलेश खैरमोडे, विक्रम सावंत, अभिनय चौधरी, मितेश चोरमोले यांच्या पथकाने केली आहे.

Post a Comment

0 Comments