उच्चभ्रू सोसायटीमध्ये काम करण्याच्या बहाण्याने घरात प्रवेश करून घरातील सोने-चांदीचे दागिने चोरून नेणाऱ्या महिलेस येरवडा पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे, तसेच तिचेकडे अधिक तपास करता तिने आंबेगाव परिसरात सुध्दा एका घरात लहान मुलगा सांभाळण्याचे काम मिळवून तेथे सुध्दा चोरी केलेची कबुली दिली. त्यावरुन भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन येथील गुन्हा उघडकीस आला आहे. सदर गुन्हयातील सोन्या-चांदीचे दागिने हस्तगत करण्यात आले आहेत. असे एकूण २ गुन्हे उघडकीस आणून १७,११,८००/- रु. किं.चे सोन्या चांदीचे दागिनेचा मुद्देमाल हस्तगत करण्यात येरवडा पोलिसांना यश आले आहे, पुढील तपास येरवडा पोलीस करत आहे.
येरवडा पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार,
कल्याणीनगर येथील उच्चभ्रू सोसायटीमध्ये दि.२८/०५/२०२४ रोजी घरातील मोलकरीण हि फिर्यादी यांचे कपाटातून १३,३६,८००/- रु.किं.चे सोन्या चांदीचे दागिने चोरी करुन घेवून गेली आहे. या बाबत येरवडा पुलिस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर गुन्हयाचा तपास करत असताना तपास पथकातील पोलीस अंमलदार पो. हवा तुषार खराडे, किरण घुटे व सुशांत भोसले यांना त्यांच्या बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, सदर गुन्हयातील आरोपी ही तिचे मुळ गावी किन्हई ता. कोरेगाव जि. सातारा येथे असलेबाबत माहिती प्राप्त झाली. सदरची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक येरवडा पोलीस स्टेशन यांना कळविल्याने त्यांनी मिळालेल्या माहिती वरुन कारवाई करणेबाबत मार्गदर्शन केले
त्याप्रमाणे तपास पथकाचे पो.उप. निरी. स्वप्निल पाटिल, व स्टाफ यांनी जावून संशयीत महिलेस ताब्यात घेतले. तिला नाव पत्ता विचारता तिने तिचे नाव सायली संतोष कार्वे वय २२ वर्षे रा.मु.पो. किन्हई ता. कोरेगाव जि. सातारा असल्याचे सांगितले. तिच्याकडे चौकशी करता तिने कल्याणीनगर भागात लहान मुलाचा सांभाळ करणेचे काम मिळवून सदर घरात प्रवेश करुन तेथील घरात चोरी केलेची कबूली दिली. सदर महिलेस अटक करुन गुन्हा उघडकीस आणला आहे. पोलीस कस्टडी दरम्यान सदर आरोपी कडून १३,११,८००/-रु.किं.चे सोन्या-चांदीचे दागिने हस्तगत करण्यात आले आहेत. तसेच तिचेकडे अधिक तपास करता तिने आंबेगाव परिसरात सुध्दा एका घरात लहान मुलगा सांभाळण्याचे काम मिळवून तेथे सुध्दा चोरी केलेची कबुली दिली. त्यावरुन भारती विदयापीठ पोलीस स्टेशनच्या अभिलेखाची पाहणी करता भारती विदयापीठ पो.स्टे.गु.र.नं.४४९/२०२४ भादवि ३८१ गुन्हा उघडकीस आला आहे. सदर गुन्हयातील ४,००,०००/- किं. चे सोन्या-चांदीचे दागिने हस्तगत करण्यात आले आहेत. असे एकूण २ गुन्हे उघडकीस आणून १७,११,८००/- रु. किं.चे सोन्या चांदीचे दागिनेचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
सदरची कामगिरी मा. पोलीस उप-आयुक्त, परिमंडळ-४, श्री. विजयकुमार मगर, मा. सहा. पोलीस आयुक्त, येरवडा विभाग, श्री. विठ्ठल दबडे, येरवडा पोलीस स्टेशनचे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. रविंद्र शेळके, यांचे मार्गदर्शना- खाली तपास पथकाचे अधिकारी पो.उप. निरी. स्वप्निल पाटील, श्रेणी पो.उप.निरी.प्रदिप सुर्वे, पोलिस अमंलदार गणपत थिकोळे, दत्ता शिंदे, तुषार खराडे, किरण घुटे, कैलास डुकरे, सागर जगदाळे, अनिल शिंदे, सुरज ओंबासे, दत्तात्रय शिंदे, प्रशांत कांबळे, सुशांत भोसले, विठ्ठल घुले यांनी केलेली आहे.
0 Comments