पुणे मुंढवा दिनांक ०८/०६/२०२४ रोजी रात्री १०:३० वा. सुमारास आनंद निवास, कामगार मैदान जवळ, रात्री साडेदहाच्या सुमारास पाणी मागितले पाणी देण्यास नकार दिले म्हणून त्यास शिवीगाळ केली, शिवीगाळ केल्याचा राग मनात धरून पाणी मागणाऱ्या व्यक्तीला बेदम मारहाण यात सदर व्यक्तीचा मृत्यू झाला आहे,
श्रीकांत निवृत्ती आल्हाट असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी राकेश तुकाराम गायकवाड ,वय-३५ रा,आनंद निवास,कामगार मैदान जवळ, मुंढवा गाव पुणे, याला अटक केली आहे, आयपीसी ३०२ नुसार गुन्हा दाखल करुन अटक केली आहे. याबाबत मयत श्रीकांत यांच्या भावाने सोमवारी दिनांक १०, मुंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, यातील फिर्यादी यांचा भाऊ नामे श्रीकांत आल्हाट, याने यातील नमुद इसम राकेश गायकवाड याचेकडे रात्रौ उशिराने पिण्याचे पाणी मागीतल्याने व ते दिले नाही म्हणुन शिवीगाळ केल्याने त्याचा राग आल्याने नमुद इसम याने फिर्यादी यांचा भाऊ श्रीकांत निवृत्ती आल्हाट, वय ४२ वर्षे रा. आनंद निवास, कामगार मैदान जवळ, मुंढवागाव, पुणे यास विटेने व सिमेंटच्या दगडाने तसेच भितींवर जोरात डोके आपटुन व लोखंडी रॉडने मारहाण करुन गंभीर जखमी करुन जिवे ठार मारले आहे,
सदर गुन्ह्यातील आरोपीला मुंढवा पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे.
0 Comments