वानवडी पोलीस स्टेशन, पुणे शहर. महंमदवाडी पुणे येथे दिनांक १८/०५/२०२४ दुकानातील एकूण ९४८ ग्रॅम सोन्याचे दागिने दरोडा टाकुन चोरुन नेले होते, फिर्यादी यांना पोलीस आयुक्त पुणे शहर यांचे हस्ते आरोपींकडून जप्त केलेला मुद्देमाल परत देण्यात आले.


वानवडी पोलीस स्टेशन, पुणे शहर. गुन्हा रजि. नं. ३५०/२०२४, भा. दं. वि. कलम ३९५,३९७,३९८, १२० (ब) भारतीय हत्यार कायदा कलम ३ (२५), महाराष्ट्र पोलीस कायदा ३७ (१) (३) सह १३५. मधील मुद्देमाल फिर्यादीस सुर्पत

फिर्यादी शफीउद्दीन शेख, वय २३ वर्षे, धंदा सोनार, यांचे बी.जी. एस. ज्वेलर्स नावाचे गाळा नंबर ५३ मॅजेस्टीक मेमरीज सोसायटी तळमजला महंमदवाडी पुणे येथे दिनांक १८/०५/२०२४ रोजी दुपारी १२/१० वा.चे सुमारास अनोळखी इसमांनी त्यांचे दुकानात सोने खरेदी करण्याच्या बहाण्याने येवून त्यापैकी एका इसमाने फिर्यादी यांना बंदुकी सारख्या हत्याराचा धाक दाखवून इतरांनी लाथाबुक्याने मारहाण करुन त्यांचा एम.आय. कंपनीचा मोबाईल हॅण्डसेट चोरी करुन दुकानातील एकूण ९४८ ग्रॅम सोन्याचे दागिने दरोडा टाकुन चोरुन नेले.

सदर घटनेबाबत वानवडी पोलीस स्टेशन, पुणे शहर. गुन्हा रजि.नं.३५०/२०२४, भा.दं. वि. कलम ३९५,३९७,३९८,१२०(ब) भारतीय हत्यार कायदा कलम ३ (२५), महाराष्ट्र पोलीस कायदा ३७ (१) (३) सह १३५. गुन्हा दाखल करण्यात आला. दाखल गुन्हयाचा समांतर तपास गुन्हे शाखा पुणे शहर यांचेकडुन करण्यात येत होता. गुन्हे शाखेला मिळालेल्या गोपणीय माहीतीचे आधारे सदर गुन्हा घडले पासून १२ तासाचे आत गुन्हे शाखेने उघडकीस आणुन यातील आरोपी नामे सनी ऊर्फ योगेश हिरामण पवळे, वय २० वर्षे, सनी ऊर्फ आदित्य राजु गाडे, वय १९ वर्षे, ओमकार ऊर्फ ओम्या जगन्नाथ वाल्हेकर, वय १९ वर्षे, नारायण ऊर्फ नारु बाळु गवळी, वय २० वर्षे, मयुर चुन्नीलाल पटेल, वय ५३ वर्षे, नासिर मेहमुद शेख, वय ३२ वर्षे व एक विधीसघर्षीत बालक यांना ताब्यात घेवून त्यांचे ताब्यातुन ६०१.१३० ग्रॅम सोन्याचे दागिने मुद्देमाल गुन्हयात जप्त करण्यात आला होता. गुन्हयातील इतर ३ आरोपी व उर्वरीत मुद्देमाल याबाबत तपास चालु आहे.

गुन्हयातील जप्त ६०१.१३० ग्रॅम सोन्याचे दागीने बाबत प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी लष्कर न्यायालय यांनी दि.२७/०५/२०२४ रोजीचे आदेशान्वये सदर जप्त मुद्देमाल फिर्यादी यांना विहीत कार्यपध्दतीचा अवलंब करुन सुपुर्त करण्याबाबत आदेशीत केले आहे. त्यानुसार जप्त ६०१.१३० ग्रॅम सोन्याचे दागिने आज दि.२८/०५/२०२४ रोजी फिर्यादी शफीउद्दीन गियासुद्दीन शेख यांना पोलीस आयुक्त पुणे शहर यांचे हस्ते सुपूर्त करण्यात आला आहे.

Post a Comment

0 Comments