पुणे - ड्रंक ॲण्ड ड्राईव्ह कारवाई. पुणे शहरातील वाहतूक शाखा व स्थानिक पोलीस स्टेशन यांचेकडुन संयुक्तपणे संपुर्ण पुणे शहर पोलीस आयुक्तालयाचे हद्दीमध्ये ३२ ठिकाणी नाकाबंदी.


दिनांक २५/०५/२०२४ रोजी १२ ते ३ वाजेपर्यंत पुणे शहरात मद्यप्राशन करुन वाहन चालवणाऱ्या वाहन चालकांवर कारवाई करण्यासाठी मा. श्री अमितेश कुमार पोलीस आयुक्त पुणे शहर, श्री, प्रविण पवार सह पोलीस आयुक्त पुणे शहर यांचे मार्गदर्शनाखाली पुणे शहरातील वाहतूक शाखा व स्थानिक पोलीस स्टेशन यांचेकडुन संयुक्तपणे संपुर्ण पुणे शहर पोलीस आयुक्तालयाचे हद्दीमध्ये ३२ ठिकाणी नाकाबंदीचे आयोजन करण्यात आले होते.

सदर कारवाई करीता प्रत्येक पोलीस स्टेशन कडील १ पोलीस अधिकारी व ४ अंमलदार व वाहतूक शाखेकडील १ पोलीस अधिकारी व ३ अंमलदार याप्रमाणे एका नाकाबंदीचे ठिकाणी २ पोलीस अधिकारी व ७ अंमलदार नेमण्यात आले होते. ड्रंक ड्राईव्ह कारवाई करीता ब्रेथ अॅनालायझर चा वापर करण्यात आला. सदर कारवाई मोहिम दरम्यान एकुण १४०९ वाहनांची कसुन तपासणी करुन ११७ वाहन चालकांवर ड्रंक ॲण्ड ड्राईव्हची कारवाई करण्यात आली. त्यामध्ये येरवडा व सहकारनगर पोलीस स्टेशनचे हद्दीमध्ये सर्वात जास्त प्रत्येकी १० व ११ कारवाया करण्यात आल्या आहेत. तसेच ड्रंक ड्राईव्हचे कारवाई सोबत इतर २६२ कारवाया करुन २,८४,५०० रुपये दंड आकारण्यात आला आहे. आगामी काळात देखील अशा प्रकारे अचानक नाकाबंदीचे आयोजन करुन कारवाया पुणे शहर पोलीस आयुक्तालयाकाडुन करण्यात येणार आहेत.

 
   श्री रोहिदास पवार
पोलीस उप आयुक्त वाहतूक शाखा पुणे शहर

Post a Comment

0 Comments