पुणे महानगरपालिका बांधकाम विभाग. रूफ टॉप हॉटेल ,पत्राशेड व अनधिकृत बांधकाम यावर बांधकाम विकास विभाग झोन ३ यांचेमार्फत पोलीस स्टाफच्या मदतीने धडक कारवाई करण्यात आली.


बाणेर येथे  दि.२५/५/२०२४ रोजी रूफ टॉप हॉटेल ,पत्राशेड व अनधिकृत बांधकाम यावर  बांधकाम विकास विभाग झोन ३  यांचेमार्फत पोलीस स्टाफच्या मदतीने धडक कारवाई  करण्यात आली.
 
सदर कारवाई मधे  सुमारे  ११९२५ चौ.फूट  क्षेत्र निष्कासित करण्यात आले आहे.
कारवाई ठिकाण - हॉटेल इमेज रेस्टोबार , आइस अँड फायर बाणेर हायवे लगत आणि हॉटेल हाईव्ह रांका ज्वेलर्सच्यावर. 
तसेच बाणेर मधील एकूण ९ रुफ टॉप हॉटेलवर गुन्हा दाखल करण्यात आला असून याव्यतिरिक्त दोन हॉटेल वर गुन्हा दाखल करणेसाठी तक्रार देण्यात आली आहे.

सदरची कारवाई पुणे महानगरपालिकेचे  बांधकाम विभागाचे अधिक्षक अभियंता - श्री.श्रीधर येवलेकर साहेब
बांधकाम विभाग झोन क्र.३ चे कार्यकारी अभियंता - श्री जयवंत पवार साहेब यांचे मार्गदर्शनाखाली
उप अभियंता - श्री. प्रकाश पवार, 
कनिष्ठ अभियंता - अजित सणस, संदीप चाबुकस्वार, केतन जाधव व
 स्टाफ, सहा पोलिस यांच्या पथकाने एक जेसीबी, दोन गॅस कटर, एक ब्रेकर दहा अतिक्रमण कर्मचारी यांचे सहाय्याने कारवाई केली.

Post a Comment

0 Comments