पुणे महानगरपालिकेकडून, शहरातील हॉटेल ,पब, चौपाटी, पत्राशेड, अनधिकृत बांधकाम यावर कारवाई करण्यात येत आहे, पालिकेकडून अनेक वर्षापासून अतिक्रमण केलेल्या जागेवर , कारवाई करण्यात येत आहे यामध्ये बालेवाडी हाय स्ट्रीट परिसरातील फीस्ट इंडिया,दार्जिलिंग कॅफे, ब्र्यू कॅफे, ग्लोबल चस्का,डॉक यार्ड, पंजाबी कॉर्नर,जगदंबा , सर्किट हाऊस,मदारी, इत्यादी हॉटेल्स. व हिप्पी अँड हार्ट,नवाब आशिया, लिट, अपाची हायस्ट्रीट, थ्री मोस्कुटोज इत्यादी पब वर कारवाई करण्यात आली
बालेवाडी व बाणेर भाग येथील बालेवाडी हाय स्ट्रीट परिसरातील हॉटेल ,पब, चौपाटी, चे पत्राशेड व अनधिकृत बांधकाम यावर दि २९/५/२०२४ रोजी बांधकाम विकास विभाग झोन ३ यांचेमार्फत पोलीस स्टाफच्या मदतीने कारवाई करण्यात आली.
सदर कारवाई मधे सुमारे 52848 चौ.फूट क्षेत्र निष्कासित करण्यात आले आहे.
सदर कारवाई पुणे महानगरपालिकेचे अधिक्षक अभियंता - श्री.श्रीधर येवलेकर
बांधकाम विभाग झोन क्र.३ चे कार्यकारी अभियंता - जयवंत पवार यांचे मार्गदर्शनाखाली
उप अभियंता - प्रकाश पवार,
कनिष्ठ अभियंता - विश्वनाथ बोटे, संदीप चाबुकस्वार ,अजित सणस, केतन जाधव व स्टाफ, ४ पोलिस ६ सुरक्षा रक्षक यांच्या पथकाने दोन जेसीबी, दोन गॅस कटर, दोन ब्रेकर दहा अतिक्रमण कर्मचारी यांचे सहाय्याने कारवाई केली.
0 Comments