दिनांक ०५/०५/२०२४ रोजी कात्रज ते नवले ब्रीजकडे जाणारे रोडवर, दत्तनगर बस स्टॉपजवळ हायवे लगत, आंबेगाव बुद्रुक पुणे येथे दोन अनोळखी इसमांनी कोणत्यातरी अज्ञात कारणासाठी फिर्यादी यांचे वडील विलास जयवंत बांदल, वय ५५ वर्षे रा. कात्रज पुणे यांचे डोक्यात, तोंडावर दगड व वीट घालुन त्यांना जिवे ठार मारले आहे. म्हणुन फिर्यादी यांनी दिले तक्रारीवरुन भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन गुन्हा रजि नंबर ३८०/२०२४, भादंवि कलम ३०२,३४ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.

दाखल गुन्हयातील अज्ञात आरोपीतांचा पोलीस अंमलदार धनाजी धोत्रे, अभिनय चौधरी, सचिन गाडे यांनी घटनास्थळ ते दत्तनगर, तसेच कात्रज हायवेवरील सर्व आस्थापनांचे सी.सी.टी.व्ही कॅमेरे चेक करुन तसेच गोपनीय बातमीदारामार्फतीने माहीती घेतली असता नमुद गुन्हयातील मयत इसम विलास बांदल यास त्याचा मित्र संतोष ऊर्फ पप्पु पाबेकर, वय ४५ वर्षे, रा. संतोषनगर, कात्रज, पुणे याने जमीनीच्या वादातुन जिवे ठार मारले आहे असे समजले.

सदर आरोपी कोणताही मोबाईल फोन वापरत नसल्यामुळे आरोपीस पकडण्यास अडचणी निर्माण होत होत्या. त्यामुळे आरोपीस पकडण्यासाठी मा. वरीष्ठ पोलीस निरीक्षक डी. एस. पाटील यांनी चार वेगवेगळ्या टीम तयार करुन आरोपीताचा शोध घेण्याच्या सुचना दिल्या होत्या. त्यानुसार भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनकडील तपास पथकाचे अधिकारी व अंमलदार हे नमुद आरोपीचा शोध घेत असताना पोलीस अंमलदार धनाजी धोत्रे, सचिन गाडे यांना आरोपीत हा रावडी, ता. भोर, जि.पुणे या गावात त्याचे नातेवाईकांना भेटण्यासाठी आला आहे अशी खात्रीशीर बातमी मिळाल्याने लागलीच तपास पथकाचे अधिकारी व कर्मचारी यांनी रावडी, ता. भोर, जि. पुणे येथे जावुन शोध घेतला असता तो मिळुन आल्याने त्यास ताब्यात घेवुन गुन्हयात अटक केली आहे.

सदरची कामगिरी मा. पोलीस उप आयुक्त परिमंडळ २, श्रीमती स्मार्तना पाटील, मा. सहाय्यक पोलीस आयुक्त स्वारगेट विभाग, पुणे श्रीमती नंदीनी वग्याणी यांचे मार्गदर्शनाखाली भारती विदयापीठ पोलीस स्टेशनकडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री डी.एस. पाटील, पोलीस निरीक्षक (गुन्हे) शरद झिने, तपास पथकाचे अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक समीर कदम, पोलीस उपनिरीक्षक धिरज गुप्ता, पोलीस अंमलदार धनाजी धोत्रे, सचिन गाडे, अभिनय चौधरी, सचिन सरपाले, मंगेश पवार, निलेश खैरमोडे, अवधतु जमदाडे, शैलेश साठे, नामदेव रेणुसे, चेतन गोरे, महेश बारवकर, निलेश जमदाडे, निलेश ढमढेरे, हनमंत मासाळ, हर्षल शिंदे, विक्रम सावंत, राहुल तांबे, यांच्या पथकाने केली आहे.