पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी सविस्तर माहिती दिली.ससून हॉस्पिटलमधील डॉक्टरांनी कट रचून बिल्डर विशाल अग्रवालच्या अल्पवयीन मुलाचे ब्लड सॅम्पल बदलले, ससूनमधील दोन डॉक्टरांना गुन्हे शाखेने अटक केली आहे. या डॉक्टरांनी अल्पवयीन आरोपीला वाचवण्यासाठी ब्लड सॅम्पलची अदलाबदल केल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे,या प्रकरणी ससूनमधील डॉ. अजय तावरे आणि डॉ. श्रीहरी हरलोर या दोघांना पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने अटक केली आहे. पोर्शे कार अपघातातील अल्पवयीन आरोपीच्या ब्लड सॅम्पलची अदलाबदल केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे.
बिल्डर विशाल अग्रवालच्या अल्पवयीन मुलाचे ब्लड सॅम्पल डॉक्टरांनी डस्टबीनमध्ये फेकले, अशी माहिती पोलिसांकडून मिळाली आहे, पुणे कल्याणीनगर येथे बिल्डर विशाल अगरवाल याच्या मुलाने मद्यपान करून केलेल्या अपघातात दोन तरुण अभियंत्यांचा,मृत्यू झाला होता. हा अल्पवयीन मुलगा आपल्या मित्रांसमवेत महागडी पोर्शे कार घेऊन पार्टी करण्यासाठी गेला होता.
या घटनेननंतर हॉटेलमधील सीसीटीव्ही तपासल्यानांतर त्याने मद्यपान केल्याचे निदर्शनास आले.
याबाबत त्याच्या रक्ताचे नमुने ससून रुग्णालयात पाठवण्यात आले होते.
रक्ताच्या नमुन्याच्या अहवालात फेरफार केल्याबाबत पोलिसांना शंका आल्यावर त्यांनी रक्ताचे नमुने तपासणीसाठी औंध याठिकाणी दिले असता औंधला दिलेले सँपल हे आरोपीचे होते, ते त्याच्या वडिलांच्या ब्लड सँपलशी मॅच झाले. पण, ससून मधून मिळालेले सॅम्पल अल्पवयीन मुलाचे नव्हते ,हे स्पष्ट झाले. ही हेराफेरी लक्षात आल्यांनतर पोलिसांनी दोन डॉक्टरांना अटक केली. डीएनए टेस्ट. केल्यांनतर पोलिसांच्या हा सर्व प्रकार लक्षात आला अशी माहिती पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली.
0 Comments