पुणे - खडक पोलीस स्टेशनची धडाकेबाज कामगिरी अग्नीशस्त्रासह रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगाराला खडक पोलीसांनी केले जेरबंद.आरोपीकडून १ गावठी बनावटीचे पिस्टल मॅगझीनसह, २ जिवंत राऊंड जप्त.


खडक पोलीस स्टेशन येथील स्टाफ पेट्रोलिंग करित असताना, बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, रेकॉर्डवरील आरोपी याचेजवळ एक गावठी पिस्टल असुन तो मिठापेल्ली वाडा गंज पेठ, पुणे या ठिकाणी थांबलेला आहे. 
पोलिसांनी सदरची माहिती वरिष्ठांना कळवून,
वरिष्ठांनी सदर बातमीची खात्री करून योग्य ती कारवाई करण्याचे आदेश दिल्याने मिळालेल्या बातमीच्या ठिकाणी जाऊन बातमीप्रमाणे खात्री करता बातमीतील रेर्कोडवरील आरोपी हा सदर ठिकाणी उभा असलेला दिसला, पोलिसांना पाहून तो त्या ठिकाणाहून नजर चुकवुन पळून जाण्याचा प्रयत्न करीत असतानच त्यास स्टाफचे मदतीने पाठलाग करून काही अंतरावर त्याला शिताफीने पकडून त्याची अंगझडती घेतली असताना, आरोपीकडून १ गावठी बनावटीचे पिस्टल मॅगझीनसह, २ जिवंत राऊंड मिळून आल्याने, खडक पोलीस स्टेशन येथे त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आरोपी याचेविरुध्द खालील गुन्हे दाखल आहेत. 

१)खडक पोलीस ठाणे २ गुन्हे

२)दत्तवाडी पोलीस ठाणे येथील १ गुन्हा.


सदर बाबत अधिक माहिती अशी की, दिनांक १०/०४/२०२४ रोजी मा. वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री रविंद्र गायकवाड, व पोलीस निरीक्षक (गुन्हे) श्री. संपतराव राऊत खडक पोलीस ठाणे पुणे शहर यांचे आदेशाने खडक पोलीस ठाणे हद्दीत गुन्हे प्रतिबंधक पेट्रोलिंग तसेच संशयित इसम चेक करीत असताना पोलीस हवालदार हर्षल दुडम यांना त्यांचे खास बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, रेकॉर्डवरील आरोपी नामे रोहित रागीर याचेजवळ एक गावठी पिस्टल असुन तो मिठापेल्ली वाडा गंज पेठ, पुणे या ठिकाणी थांबलेला आहे. अशी बातमी मिळाल्याने सदरची बातमी पो.उप-निरी. प्रल्हाद डोंगळे यांना कळविले असता त्यांनी ती मा. वरिष्ठांना कळविली असता मा. वरिष्ठांनी सदर बातमीची खात्री करून योग्य ती कारवाई करण्याचे आदेश दिल्याने मिळालेल्या बातमीच्या ठिकाणी पो.उप-निरी. प्रल्हाद डोंगळे, पोलीस हवालदार हर्षल दुडम, पोलीस शिपाई आशिष चव्हाण, पोलीस शिपाई इरफान नदाफ, पोलीस शिपाई लखन ढावरे, पोलीस शिपाई अक्षयकुमार वाबळे, पोलीस शिपाई प्रमोद भोसले असे जावून बातमीप्रमाणे खात्री करता बातमीतील रेर्कोडवरील आरोपी हा सदर ठिकाणी उभा असलेला दिसला त्याची व आमची नजरानजर होताच तो त्या ठिकाणाहून नजर चुकवुन पळून जाण्याचा प्रयत्न करीत असतानच त्यास स्टाफचे मदतीने पाठलाग करून काही अंतरावर त्याला शिताफीने पकडून त्यास त्याचे नाव व पत्ता विचारले असता त्याने त्याचे नाव रोहित श्रीनिवास रागीर वय २४ वर्षे रा. सहारा कॉम्पलेक्स  गफुर तकिया ३४३ घोरपडे पेठ पुणे असे सांगितले. त्याची पंचासमक्ष अंगझडती घेतली असता त्याचे पैन्टमध्ये कंबरेस डावे बाजुस खोचलेले एक लोखंडी धातूचे गावठी बनावटीचे पिस्टल मॅगझीनसह त्याची किंमत ५५,०००/- रूपये व त्याचे नेसते पँटचे उजवे खिशात २ जिवंत राऊंड त्याची किंमत रुपये २,०००/- किंमतीचा असा एकूण ५७,०००/- रूपये किंमतीचा मुद्देमाल मिळून आल्याने तो पंचासमक्ष जप्त करण्यात आला असून त्यास दिनांक १०/०४/२०२४ रोजी ११ वा. अटक करण्यात आली असून पुढील तपास पोलीस उप-निरीक्षक श्री. प्रल्हाद डोंगळे हे करीत आहे. नमूद अटक आरोपी याचेविरुध्द खालील गुन्हे दाखल आहेत. 

१) खडक पोलीस ठाणे गु.र.नं.१९८/२०२१ आर्म अॅक्ट ४,२५ क्रि.लॉ.अ. कलम ७ मपोअधि.३७ (१) सह १३५, भादवि कलम १८८ आपत्ती व्यवसापन ५१ बी प्रमाणे 

२) खडक पोलीस ठाणे गु.र.नं.२६३/२०२१ भादवि कलम ३२४,३२३,५०४,३४ प्रमाणे 

३) दत्तवाडी पोलीस ठाणे गु.र.नं.२०३/२०२१ भादवि कलम ३२४ प्रमाणे

नमुद कारवाई श्री. अमितेश कुमार पोलीस आयुक्त, श्री. प्रविण पवार पोलीस सह आयुक्त, श्री. प्रविण पाटील, अपर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशिक विभाग पुणे, श्री. संदिपसिंह गिल, पोलीस उप आयुक्त परिमंडळ- १ पुणे व श्रीमती रुक्मिणी गलांडे, सहा पोलीस आयुक्त फरासखाना विभाग यांचे मार्गदर्शनाखाली खडक पोलीस स्टेशनचे श्री रविंद्र गायकवाड, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, श्री. संपतराव राउत पोलीस निरीक्षक (गुन्हे), श्री. प्रल्हाद डोंगळे पोलीस उप-निरीक्षक, पोलीस अंमलदार किरण ठवरे, हर्षल दुडम, संदीप तळेकर, आशिष चव्हाण, इरफान नदाफ, प्रमोद भोसले, अक्षयकुमार वाबळे, लखन ढावरे, रफिक नदाफ, प्रशांत बडदे, सागर कुडले, तुळशीराम टेभुर्णे, महेश जाधव, यांचे पथकाने केली आहे.

Post a Comment

0 Comments