पुणे - शिवाजीनगर तपास पथकाची कामगिरी सराईत मोटार सायकल चोरांकडुन ३ मोटारसायकल जप्त करुन ३ गुन्हे उघडकीस.


शिवाजीनगर येथे दाखल असलेल्या वेगवेगळ्या गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेण्यासाठी वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांनी सूचना दिल्या होत्या त्याच अनुषंगाने पोलिसांना माहिती मिळाली शिवाजीनगर पोलीस स्टेशन येथील गुन्ह्यातील  आरोपी हा गुन्ह्यात चोरी गेलेली मोटार सायकल सहित संचेती हॉस्पीटल समोरील रोडवरुन येणार आहे. शिवाजीनगर पोलिसांनी आरोपीला शिताफीने ताब्यात घेऊन त्याची सखोल चौकशी केली असताना त्याच्याकडून तीन मोटार सायकल हस्तगत करून या गुन्ह्यामध्ये शिवाजीनगर पोलिसांकडून सखोल चौकशी करून तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे.


शिवाजीनगर पोलीस स्टेशन येथे मोटार सायकल चोरी बाबतचे गुन्हे दाखल असल्याने सदर गुन्ह्यांचा तपास मा. वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकातील पोलीस उप निरीक्षक अजित बडे व पोलीस अंमलदार हे करीत असताना, तपासा दरम्यान पोलीस अंमलदार प्रविण दडस यांना खबर मिळाली कि, शिवाजीनगर पोलीस स्टेशन येथील गुन्ह्यातील  आरोपी हा गुन्ह्यात चोरी गेलेली मोटार सायकल सहित संचेती हॉस्पीटल समोरील रोडवरुन येणार आहे. त्यानुसार पोलीस उप-निरीक्षक अजित बडे, पोलीस अंमलदार रणजित फडतरे, अतुल साठे, व प्रविण दडस यांनी सापळा लावुन दिनांक १०/०४/२०२४ रोजी आरोपी विशाल सुरेश साळुंखे वय २२ वर्ष रा. सरकार चौक, म्हाळुंगे, हिंजवडी, पिंपरी चिंचवड, यास गुन्ह्यातील मोटारसायकल सह ताब्यात घेतले.

सदर आरोपीकडे केलेल्या तपासात शिवाजीनगर पोलीस स्टेशन गुन्हा रजि नं २६६/२०२३ भादवि क ३७९ या गुन्ह्याची उकल होवुन सदर गुन्हा हा अटक आरोपीचा भाऊ सौरभ सुरेश साळुंखे व त्याचा साथीदारांनी केल्याचे समजले, व सदरचे पाहिजे आरोपी हे क-हाड, सातारा येथे असल्याचे समजले त्यावरुन दिनांक १०/०४/२०२४ रोजी पोलीस उप निरीक्षक अजित बडे व तपास पथकातील अंमलदार हे क-हाड येथे जावुन सदर गुन्ह्यातील चोरीस गेलेली मोटार सायकल व आरोपी सौरभ सुरेश साळुंखे वय २० वर्ष रा. क-हाड, सातारा यास ताब्यात घेतले. सदर आरोपीकडे त्याचा साथीदाराबाबत तपास करुन आरोपी मनोज मारुती तोळे वय २० वर्ष रा. क-हाड  सातारा, यास ताब्यात घेतले. तसेच सदर आरोपीकडे अधिक तपास केला असता आरोपी सौरभ सुरेश साळुंखे व विशाल सुरेश साळुंखे यांनी वाकड पोस्टे गु.र.नं ४६२/२०२४ भादवि क ३७९ मधील मोटार सायकलचोरी केल्याचे कबुल केले नमुद आरोपी यांना अटक करण्यात आली आहे.

सदरची कारवाई मा. पोलीस उप-आयुक्त संदिपसिंह गिल्ल, मा. सहा पोलीस आयुक्त श्री. साईनाथ ठोंबरे, मा. वरीष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रशेखर सावंत, पोलास निरीक्षक अनिल माने (गुन्हे) यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली पोलीस उप निरीक्षक अजित बडे, पोलीस उप निरीक्षक रोहिदास मुंडे, सहा. पोउपनि अविनाश भिवरे, पोलीस अंमलदार रणजित फडतरे, अतुल साठे, राजकिरण पवार, प्रविण दडस, सुदाम तायडे महिला पोलीस अंमलदार द्वारका मोहिते यांनी केली आहे.

Post a Comment

0 Comments