वारजे माळवाडी पोलीस स्टेशन हद्दीत सह्याद्री शाळा चौक येथे वारजे माळवाडी वाहतूक विभागाचे पोलीस वाहतुक नियमानाचे कर्तव्य करत असताना त्यांना गणपती माथा कडुन वारजे ब्रिजचे दिशेने एक डार्कग्रिण व काळया रंगाची तसेच संपुर्ण काळ्या काचा असलेली विनानंबर प्लेटची महिंद्रा थार चारचाकी गाडी येत असताना दिसली. वाहतूक पोलिसांना संशय आल्याने त्यांनी गाडी अडवली पोलिसांनी गाडी बद्दल विचारणा केली असता गाडीत बसलेले इसम हे उडवा-उडवीची उत्तरे देवु लागले व सहकार्य करत नसल्याने पोलीस अंमलदार मिलारे यांना त्यांचेवर संशय आला त्यामुळे त्यांनी लगेच अधिक पोलीस मदतीसाठी वारजे माळवाडी पोलीस स्टेशन येथे संपर्क करुन वारजे माळवाडी पोलीस स्टेशनचे तपास पथकाचे पोलीस अधिकारी पोलीस उपनिरीक्षक रामेश्वर पार्वे यांचे सोबत तपास पथकातील पोलीस स्टाफ सह सदर ठिकाणी तात्काळ हजर झाले. इसम हे गाडी सोडून पळून जाऊ लागले पोलिसांनी त्यांचा पाठलाग करून त्यांना अटक केली ,त्यांची अंगझडती घेतली व सखोल चौकशी केली असतात त्यांच्याकडून दोन पिस्टन उच्चार जिवंत राऊंड मिळून आले, या संदर्भात वारजे पोलिसांनी आरोपींना अटक करून त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे
वारजे माळवाडी पोलीस स्टेशन हद्दीत सह्याद्री शाळा चौक, वारजे पुणे येथे दिनांक ०५/०४/२०२४ रोजी दुपारी वारजे माळवाडी वाहतुक विभागाचे पोलीस अंमलदार विशाल भिलारे हे त्यांचे इतर दोन सहकारी महिला पोलीस अंमलदार घाडगे व चव्हाण यांचे समवेत वाहतुक नियमानाचे कर्तव्य करत असताना त्यांना गणपती माथा कडुन वारजे ब्रिजचे दिशेने एक डार्कग्रिण व काळया रंगाची तसेच संपुर्ण काळ्या काचा असलेली विनानंबर प्लेटची महिंद्रा थार चारचाकी गाडी येत असताना दिसली.
त्यावर पोलीस अंमलदार भिलारे यांना संशय आल्याने सदरची गाडी त्यांनी त्यांचे सोबत असलेल्या महिला पोलीस अंमलदार यांचे सहाय्याने बाजुला घेतली असता गाडी मध्ये त्यांना दोन इसम दिसुन आले. त्यातील चालक यांचे कडे ते विचारपुस करत असताना ते त्यांना उडवा-उडवीची उत्तरे देवु लागले व सहकार्य करत नसल्याने पोलीस अंमलदार मिलारे यांना त्यांचेवर संशय आला त्यामुळे त्यांनी लगेच अधिक पोलीस मदतीसाठी वारजे माळवाडी पोलीस स्टेशन येथे संपर्क करुन वारजे माळवाडी पोलीस स्टेशनचे तपास पथकाचे पोलीस अधिकारी पोलीस उपनिरीक्षक रामेश्वर पार्वे यांचे सोबत तपास पथकातील पोलीस स्टाफ सह सदर ठिकाणी तात्काळ हजर झाले.
वारजे तपास पथकाचे अधिकारी अंमलदार हे सदर ठिकाणी येताच दोन्ही संशयीत इसम हे त्यांचेकडे असलेली थारगाडी तेथेच सोडुन वेगवेगळ्या दिशेला पळून जावु लागले. त्यामुळे तपास पथकातील अधिकारी अंमलदार यांनी नमुद दोन्ही इसमांना पाठलाग करुन शिताफीने ताब्यात घेवुन सह्याद्री शाळा चौक येथे घेवुन आले. त्यावर नमुद दोन्ही इसांकडे कसुन विचारपुस केली असता त्यांनी त्यांचे नाव १) अनिरुद्ध ऊर्फ विकी बाळु राजु जाधव, वय २६, रा.रावेत गाव, जाधव वस्ती, पिंपरी चिंचवड, ता. हवेली, जि पुणे व २) निखिल
राजु सरोदे, वय ३० वर्षे, रा. डिलक्स चौक शेजारी, गणपती मंदिरासमोर, पिंपरी, पुणे असे असल्याचे सांगितले. त्यावर त्यांची अंगझडती घेतली असता त्यातील आरोपी नामे अनिरुद्ध ऊर्फ विकी बाळु राजु जाधव याचे ताब्यातुन १ पिस्टल व ३ जिवंत राऊंड तसेच महिंद्रा थारगाडी जप्त करण्यात आले. त्यावर दोन्ही आरोपीं बाबत अधिक माहिती घेतली असता यातील दोन्ही आरोपी हे पिंपरी चिंचवड भागातील सराईत गुन्हेगार असल्याची तसेच यातील अनिरुद्ध ऊर्फ विकी बाळु राजु जाधव हा पिंपरी चिंचवड भागातील रावन टोळीचा म्होरक्या असल्याची तसेच त्यास पुणे जिल्हा हद्दीतुन दोन वर्षांकरीता तडीपार केले असल्याबाबत माहिती मिळुन आली. त्यामुळे वारजे माळवाडी पोलीस स्टेशन येथे गु.रजि.नं. १३९/२०२४ भारतीय हत्यार प्रतिबंधक कायदा कलम ३ (२५) व महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम १४२ व ३७(१) (३) सह १३५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात येवुन दाखल गुन्ह्याचे तपासा मध्ये यातील आरोपी नामे निखिल राजु सरोदे याचे ताब्यातुन आणखी १ देशी बनावटीचे पिस्टल व १ जिवंत राऊड जप्त करण्यात आले आहे. दाखल गुन्ह्याचा अधिक तपास हा पोलीस उपनिरीक्षक रामेश्वर पार्दै, वारजे माळवाडी पोलीस स्टेशन पुणे शहर हे करत आहेत.
सदरची कामगिरी ही मा. पोलीस उपआयुक्त परिमंडळ ३. पुणे श्री संभाजी कदम, मा सहा. पोलीस आयुक्त कोथरुड विभाग श्री भिमराव टेळे, वारजे माळवाडी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री मनोज शेडगे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) श्री निळकंठ जगताप यांचे मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे अधिकारी सहा. पोलीस निरीक्षक रणजीत मोहिते, पोलीस उप निरीक्षक रामेश्वर पार्वे, पोलीस अंमलदार प्रदिप शेलार, भुजंग इंगळे, मनोज पवार, विजय भुरुक, बंटी मोरे, श्रीकांत भांगरे, विक्रम खिलारी, संभाजी दराडे, अजय कामठे, सत्यजित लोंढे तसेच वारजे वाहतुक विभागाचे विशाल भिलारे व महिला पोलीस अंमलदार घाडगे, चव्हाण यांनी केली आहे.
0 Comments