फरासखाना पोलीस स्टेशन, पुणे शहर. फरासखाना पोलिसांकडून ६ वर्षाच्या मुलाचे अपहरण करणाऱ्या दोन महिला आरोपींना अटक.

फरासखाना पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये सहा वर्षाचा मुलगा हा बेपत्ता झाला आहे अशी तक्रार पोलीस स्टेशनमध्ये नोंद करण्यात आली होती, या संदर्भात वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली सदर भागातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करण्यात आली त्यावेळेस पोलिसांना दोन महिला सदर मुलाला रिक्षामध्ये बसून नेत आहे असे दिसून आले त्या संदर्भात पोलिसांनी रिक्षाचा नंबर ट्रेस करून रिक्षाचा शोध लावला रिक्षा चालकाला ताब्यात घेऊन त्याची विचारणा केली असता त्याने त्याच्या ओळखीच्या महिला आहेत अशी पोलिसांना माहिती दिली पोलिसांनी सदर महिलेला अटक करून दुसरी महिला ही स्वारगेट परिसरामध्ये दिसून आल्याची माहिती पोलिसांना मिळाली, पोलिसांनी स्वारगेट परिसरामध्ये जाऊन महिलेला ताब्यात घेतले महिलेसोबत अपहरण झालेला सहा वर्षाचा मुलगा मिळून आला आहे.सदरचा गुन्हा केल्याची कबुली दिली असुन तिला दाखल गुन्हयात अटक करण्यात आली आहे.


 यातील फिर्यादी यांचा मुलगा, वय ६ वर्षे, हा दिनांक ०४/०४/२०२४ रोजी ११ वा चे सुमारास रहाते घरातून खेळण्यास जातो. असे सांगुन निघुन गेला तो घरी आला नाही. त्यामुळे फिर्यादी यांनी त्यांचे मुलाचा आजुबाजुचे परिसरात शोध घेतला असता तो मिळुन न आल्याने सदर मुलास कोणीतरी अज्ञात व्यक्तीने अज्ञात कारणासाठी फुस लावुन पळवुन नेले आहे. म्हणुन फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारीवरुन फरासखाना पोलीस ठाणे, पुणे गुन्हा रजि. नंबर- ८०/२०२४, भा.दं.वि कलम ३६३ प्रमाणे दिनांक ०४/०४/२०२४ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दाखल गुन्हयातील अपहृत मुलगा वय ६ वर्षे, याचेसह आरोपीचा शोध घेत असताना घटनास्थळाचे परिसरातील तपास पथकातील पोलीस अंमलदार वैभव स्वामी, प्रविण पासलकर, सुमित खुटटे, संदीप कांबळे, राकेश क्षीरसागर यांनी सी सी टी व्ही फुटेज तपासले असता यातील अपहृत मुलगा यास दोन अनोळखी महीला संशयीत रित्या रिक्षातुन घेवुन जात असलेबाबत दिसुन आले. त्यानंतर त्यांनी सदर रिक्षाचा सी सी टी व्ही फुटेजचे आधारे नंबर तपासुन निष्पन्न करुन रिक्षा चालकाकडुन माहीती घेतली व रिक्षात मुलाला घेवुन जाणा-या अनोळखी महीलांची ओळख पटविली असता सदरच्या महीला या फिर्यादी यांचे राहते परिसरात रहाण्यास असले बाबत माहीती मिळाल्याने सदर दोन अनोळखी महीलेपैकी एक महीला नामे नाझमा बिलाल शेख, वय ४३ वर्षे, रा २९५ बुधवार पेठ, ढमढेरे बोळ, पुणे ही ढमढेरे बोळ बुधवार पेठ, पुणे हीस ताब्यात घेवुन तिचेकडे तपास करता तिने गुन्हयाची स्पष्ट कबुली दिलेने तिला दाखल गुन्हयाचे कामी दि.०५/०४/२०२४ रोजी अटक करण्यात आली आहे.

सदर महीला आरोपीने यातील अपहृत मुलगा हा महीला हिचेकडे असलेबाबत सांगीतले. तिचा शोध घेत असताना दिनांक- ०६/०४/२०२४ रोजी सदर महीला ही यातील अपहृत मुलास घेवुन स्वारगेट एस टी स्टॅन्ड, परिसरात संशयीत रित्या फिरत असल्याचे समजले. सदर पथकाने यातील महीला आरोपी नामे रेणु दिलीप राठोड, वय-४१ वर्षे, रा- २९५ बुधवार पेठ, ढमढेरे बोळ, पुणे हीस यातील अपहृत मुलासह स्वारगेट एस टी स्टॅन्ड पुणे येथुन ताब्यात घेवुन सदर महीला आरोपी हीचेकडे गुन्हयाबाबत तपास केला असता तिने सदरचा गुन्हा केल्याची कबुली दिली असुन तिला दाखल गुन्हयात दिनांक- ०६/०४/२०२४ रोजी अटक करण्यात आली आहे.

सदरची कारवाई मा. पोलीस उप आयुक्त परिमंडळ -१ पुणे, श्री संदीप सिंह गिल्ल, मा. सहाय्यक पोलीस आयुक्त, फरासखाना विभाग पुणे श्रीमती रुक्मीणी गलंडे, यांचे मार्गदर्शनाखाली फरासखाना पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, श्री. प्रशांत भस्मे, सहा. पो. निरी. वैभव गायकवाड, पोलीस उप निरीक्षक जयसिंग दाढे, पोलीस उप निरीक्षक, निलेश मोकाशी, पोलीस अंमलदार मेहबुब मोकाशी, प्रविण पासलकर, वैभव स्वामी, अविनाश गोपनर, गोविंद गुरव, प्रमोद मोहीते, सुमित खुट्टे, संदीप कांबळे, राकेश क्षीरसागर, समीर माळवदकर, अर्जुन कुडाळकर, महीला पोलीस अंमलदार आशा कांबळे, जयश्री पवार, पुनम ओव्हाळ, अनिता महाडीक, मिनाज शेख, उज्वला बनसोडे, यांच्या पथकाने केली आहे.

Post a Comment

0 Comments