शुक्रवार पेठ येथून फिर्यादी जात असताना चार आरोपी हे संगनमत करुन फिर्यादी यांच्या जवळ येऊन त्यांना हाताने मारहाण करून त्यांच्या गळ्यातील सोन्याची चैन जबरदस्तीने चोरून नेल्याची तक्रार खडक पोलीस स्टेशन येथे नोंद करण्यात आली होती , त्याच अनुषंगाने खडक पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र गायकवाड यांनी दोन तपास पथके तयार करून त्यांना आरोपींचा शोध लावण्यासाठी मार्गदर्शन केले, त्या अनुषंगाने पोलिसांनी आरोपींचा शोध लावून चार आरोपींना अटक करण्यात आली आहे आरोपीकडुन एकुण १ लाख ,३३ हजार,२८३/- रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.पुढील तपास पोलीस करत आहे.
सदरबाबत अधिक माहीती अशी की, फिर्यादी हे दि.२९/०३/२०२४ रोजी रात्रौ ११/३० वा. सुमारास बोबींल मार्केट, शुक्रवार पेठ, पुणे समोरील हरिभाऊ भंडारी या सार्वजनिक रोडवरती आरोपी क्र. १ वय अंदाजे २४ वर्ष वयाचा, अंगाने सडपांतळ असणारा, काळया रंगाची पॅन्ट व काळया रंगाचा शर्ट घातलेला अनोळखी इसम व आरोपी क्र. २ वय अंदाजे २५ वर्ष, अंगाने सडपांतळ काळ्या रंगाची पॅन्ट व पांढ-या रंगाचा शर्ट घातलेल्या इसमाने जबरदस्तीने फिर्यादी यांची दुचाकी अडवुन शिवीगाळ करुन आरोपी क्र. ३ अदांजे २५ वर्ष वयाचा, अंगाने मजबुत व पांढ-या रंगाचा शर्ट घतलेला अनोळखी इसम व आरोपी क्र. ४ अभिषेक दशरथ वाघमारे ऊर्फ मम्या वय-२२ वर्ष पत्ता :वडगाव बु.पुणे यांनी सर्वानी संगनमत करुन शिवीगाळ व हाताने मारहाण करुन, जबदरस्तीने व बळजबरीने फिर्यादी यांचे गळयातील सोन्याची चेन चोरी करुन घेऊन गेल्याने फिर्यादी यांनी याबाबत खडक पोलीस स्टेशन गुन्हा रजि क्रमांक ९६/२०२४ भादवि कलम ३९२,३४१,३२३,५०४,३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.
रात्रीच्या वेळेस अशा प्रकारे दुचाकीवरून जाणा-या व्यक्तिस अडवून मारहाण व धमकावुन लुटण्याचा प्रकार घडल्याने त्याबाबत वरिष्ठ पोलीस निरिक्षक, श्री. रविंद्र गायकवाड यांनी तात्काळ दखल घेवुन श्री. संपतराव राउत, पोलीस निरिक्षक गुन्हे यांचेमार्फत तात्काळ दोन तपास पथके तयार करुन त्यांना तपासाबाबत योग्य सुचना दिल्या. तसेच वरिष्ठांनी तपास पथकास दिलेल्या सुचनाप्रमाणे तपास पथकाचे प्रभारी पोलीस उप- निरीक्षक श्री प्रल्हाद डोंगळे व त्यांचे स्टाफमधील किरण ठवरे, हर्षल दुडम, आशिष चव्हाण, प्रमोद भोसले, अक्षयकुमार वाबळे, हे गस्त करीत असताना पोलीस अंमलदार आशिष चव्हाण व पोलीस अंमलदार प्रमोद भोसले यांना त्यांच्या बातमीदाराने बातमी दिली की, जबरी चोरी करणारे इसम हे घोरपडे पेठ येथील मंत्रा हॉटेलच्या मागील बाजूस असणा-या मोकळ्या जागेत आले असल्याची खात्रीशीर माहीती प्राप्त झाली. त्या अनुषंगाने सदर ठिकाणी जावुन जबरी चोरी करणार-या पैकी आरोपी अभिषेक दशरथ वाघमारे ऊर्फ मम्या वय- २२ वर्ष पत्ता-: फ्लॅट नं.२१३, महेश गॅलेक्सी, वडगाव बु.पुणे. याला ताब्यात घेवून व त्याचेकडून मिळालेल्या माहितीचे आधारे इतर आरोपी नामे १) मयुर किरण भोसले, वय १९ वर्षे, रा.१३३ दांडेकर पुल पुणे २) सुदर्शन विजय व मोठे, वय २४ वर्षे, रा.१३३ दांडेकर पुल पुणे यांना सापळा रचुन शिताफीने ताब्यात घेवुन दाखल गुन्हयात अटक करण्यात आली आहे.
गुन्हयातील अटक आरोपी यांचेकडून गुन्हयात जबरी चोरी केलेली १) सोन्याची अंगठी अंदाजे ७ ग्रॅम वजनाची रूपये ४३,२८३ तसेच गुन्हयात वापरलेली २ दुचाकी अशी मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. त्या अनुषंगाने अधिक तपास चालु आहे. अशा प्रकारे अटक आरोपीकडुन एकुण १,३३,२८३/- रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.
नमुद कारवाई श्री. अमितेश कुमार पोलीस आयुक्त, श्री. प्रविण पवार पोलीस सह आयुक्त, श्री. प्रविण पाटील, अपर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशिक विभाग पुणे, श्री. संदिपसिंह गिल, पोलीस उप आयुक्त परिमंडळ १ पुणे व श्रीमती रूक्मिणी गलांडे, सहा पोलीस आयुक्त फरासखाना विभाग यांचे मार्गदर्शनाखाली खडक पोलीस स्टेशनचे श्री रविंद्र गायकवाड, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, श्री. संपतराव राउत पोलीस निरीक्षक (गुन्हे), श्री नितीनकुमार नाईक, सहा. पोलीस निरीक्षक, श्री. प्रल्हाद डोंगळे पोलीस उप-निरीक्षक, श्री. अजीज बेग पोलीस उप-निरीक्षक पोलीस अंमलदार किरण ठवरे, हर्षल दुडम, संदीप तळेकर, आशिष चव्हाण, प्रमोद भोसले, अक्षयकुमार वाबळे, प्रशांत बडदे, लखन ढावरे, रफिक नदाफ, सागर कुडले, तुळशीराम टेंभुर्णे, महेश जाधव, चंद्रशेखर खरात, प्रविण गावीत, सुहास साळुंके यांचे पथकाने केली आहे.
0 Comments