युनिट ५ गुन्हे शाखा पुणे शहर. मौजमजेसाठी चोरले चार चाकी वाहन,चोरटा युनिट-५ कडुन २४ तासात अटक, तसेच विधीसंघर्षीत बालक ताब्यात. आरोपींकडून १० लाख,५० हजार, रुपये किमतीच्या २ चारचाकी गाड्या जप्त.


हडपसर येथील चिंतामणी मोटर्स कार बाजार दुकानाचे सटर तोडून त्यातील चार चाकी दोन वाहने चोरून नेल्याची तक्रार पोलिसांना मिळाली होती, त्याच अनुषंगाने गुन्हे शाखा युनिट ५ हे आरोपींचा शोध घेत असताना, माहिती मिळाली की सदर गुन्ह्यातील आरोपी  पवन आलकुंटे याने त्याचे मित्रासह चारचाकी गाड्या चोरुन त्यापैकी एका गाडीची नंबरप्लेट काढुन तिचा वापर करीत असुन ते यवत वरुन पुण्याचे दिशेने येणार आहे,मिळालेली माहिती वरिष्ठांना कळवून, युनिट ५ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्वजीत काईंगडे यांचे सुचनेप्रमाणे शेवाळेवाडी, सोलापुर रोड येथे नाकाबंदी करून. नाकाबंदी दरम्यान गुन्हयात चोरीस गेलेली गाडी यवतच्या दिशेने आल्याचे निदर्शनास आल्याने तिस स्टाफच्या मदतीने थांबविण्यात आले. गाडीतून दोन इसमांना ताब्यात घेण्यात आले आहे, त्यातील आरोपी पवन शंकर अलकुंटे, असे असल्याचे सांगितले असुन त्यास दाखल गुन्हयात अटक करुन विधीसंघर्षीत बालक याला ताब्यात घेऊन त्यांचेकडे केलेल्या तपासात त्यांनी गुन्हा केल्याचे कबूल केले आहे.
आरोपींकडून  १० लाख,५०हजार, रुपये किमतीच्या २ चारचाकी गाड्या जप्त केल्या आहेत.


दि.३१/०३/२०२४ रोजी रात्रीचा अंधाराचा फायदा घेऊन अज्ञात चोरटयांनी हडपसर येथील चिंतामणी मोटर्सचे दुकानाचा दरवाजा तोडुन त्यातुन १० लाखाच्या दोन गाडया चोरुन नेले म्हणुन हडसर पोलीस ठाणे येथे घरफोडीचा गुन्हा दाखल आहे. सदर गुन्हयाचा तपास करणेकामी मा. वरिष्ठांनी आदेशित केले आहे.

त्याप्रमाणे गुन्हे शाखा युनिट-५ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्वजीत काईंगडे यांनी युनिट कडील पोलीस अधिकारी व अंमलदार यांचेसह गुन्हयाचे घटनास्थळी भेट देऊन तपासाचे चक्रे सुरू केली असता, युनिट कडील पोलीस अंमलदार अमित कांबळे यांना त्यांचे बातमीदारां मार्फतीने बातमी मिळाली की, इसम नामे पवन आलकुंटे याने त्याचे मित्रासह चारचाकी गाड्या चोरुन त्यापैकी एका गाडीची नंबरप्लेट काढुन तिचा वापर करीत असुन ते यवत वरुन पुण्याचे दिशेने येणार आहे. त्याप्रमाणे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्वजीत काईंगडे यांचे सुचनेप्रमाणे शेवाळेवाडी, सोलापुर रोड येथे नाकाबंदी लावली. नाकाबंदी दरम्यान गुन्हयात चोरीस गेलेली गाडी यवतच्या दिशेने आल्याचे निदर्शनास आल्याने तिस स्टाफच्या मदतीने थांबविण्यात आले. त्यामध्ये दोन इसम आढळुन आले त्यांना नाव पत्ता विचारता त्याने आपले नाव १) पवर शंकर अलकुंटे, वय २० वर्षे, रा. अलकुंटेवस्ती, शंकरमठ, हडपसर, पुणे असे असल्याचे सांगितले असुन त्यास दाखल गुन्हयात अटक करुन विधीसंघर्षीत बालक याला ताब्यात घेऊन त्यांचेकडे केलेल्या तपासात त्यांनी गुन्हा केल्याचे कबुली देऊन कार बाजारातील दुकानाचे शटर तोडुन दुकानातुन चाव्या घेऊन दोन चारचाकी गाडया मौजमज्जा करणेकामी चोरल्याचे सांगुन त्यांचेकडुन १०,५०,०००/-रु.कि.च्या दोन चारचाकी गाड्या जप्त केल्या आहेत. नमुद आरोपीची न्यायालयीन कोठडीत रवानगी झाली असुन विधीसंघर्षीत बालक ताब्यात आहे.

सदरची कामगिरी ही मा. पोलीस उपायुक्त, गुन्हे, श्री. अमोल झेंडे, मा. सहायक पोलीस आयुक्त, श्री. सतिश गोवेकर, यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्वजीत काईंगडे, पोलीस उप निरीक्षक अविनाश लोहोटे, पोलीस अंमलदार प्रताप गायकवाड, शहाजी काळे, दया शेगर, विनोद शिवले, अमित कांबळे, अकबर शेख, राहुल ढमढेरे, पांडुरंग कांबळे व संजयकुमार दळवी यांनी केलेली आहे.

Post a Comment

0 Comments