पुणे - वानवडी पोलिसांची कामगिरी मोक्का व फायरींग मधील गुन्हयातील १० महिन्यापासून फरार असलेल्या आरोपीला रामटेकडी हडपसर येथून अटक.


वानवडी पोलीस स्टेशन हद्दीमधील घडलेल्या गुन्ह्यांमधील फरार आरोपींचा शोध घेण्यासाठी  वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री संजय पतंगे यांनी
तपास पथक अधिकारी यांना आदेशित केले होते, वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली आरोपींचा शोध घेत असताना वानवडी पोलिसांना  माहिती मिळाली की,  गुन्ह्यातील फरार आरोपी हा रामटेकडी हडपसर येथे थांबला आहे, सदर आरोपीला शिताफिने ताब्यात घेवून त्यास अटक करण्यात आली आहे.

वानवडी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री संजय पतंगे यांनी तपास पथक प्रभारी व स्टाफ यांना गुन्हयाचे अनुषंगाने मार्गदर्शन करुन सुचना दिलेल्या होत्या. त्याप्रमाणे दि.०८/०४/२०२४ रोजी सुचने प्रमाणे तपास पथकातील स्टाफ हा मकोकातील पाहिजे आरोपींचा शोध घेताना पोलीस हवालदार सर्फराज देशमुख यांना बातमीदारा मार्फत बातमी मिळाली कि, वानवडी पो.स्टे. गुन्हा रजि.नं. २५८/२०२३ भा.दं. वि. कलम ३०७,१२० (ब), २१२,१०८,१०९,२०१, ३४, क्रिमिनल लॉ अमेंडमेंट अॅक्ट कलम ७, भारतीय हत्यार कायदा कलम ३ (२५), महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ३७(१) (३) सह १३५ सह महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम कलम ३(१) (ii), ३ (२), ३ (४) या गुन्हयातील पाहिजे आरोपी अक्षय नागनाथ कांबळे, रा. ससाणेनगर, लेन नंबर १५, हडपसर पुणे हा रामटेकडी इंडस्ट्रियल एरिया, रेल्वे अंडरबायपास जवळ, रामटेकडी, हडपसर पुणे येथे कोणाची तरी वाट पहात थांबलेला आहे

अशी बातमी मिळाल्याने सदरची बातमी वरिष्ठ पोलीस निरीक्षक वानवडी पो.स्टे. पुणे यांना कळविली असता त्यांनी बातमीचे ठिकाणी जावून नमूद आरोपीचा शोध घेवून तो मिळून आल्यास योग्य ती कारवाई करणेचे आदेशीत केल्याने तपास पथकातील स्टाफ रवाना झाले. मिळालेल्या माहितीचे आधारे वरील दाखल गुन्हयातील पाहिजे आरोपी नामे अक्षय नागनाथ कांबळे यास शिताफिने ताब्यात घेवून त्यास अटक करण्यात आली.

सदरची कामगिरी मा. पोलीस उप आयुक्त परि.-५, पुणे शहर श्री आर राजा, मा. सहा. पोलीस आयुक्त वानवडी विभाग पुणे शहर श्री गणेश इंगळे, वानवडी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक श्री. संजय पतंगे, पोलीस निरिक्षक (गुन्हे) श्री. राजेंद्र करणकोट यांचे मार्गदर्शनाखाली व तपास पथकातील पोलीस उप निरिक्षक संतोष सोनवणे, हरिदास कदम, सर्फराज देशमुख, महेश गाढवे, अमजद पठाण, विनोद भंडलकर, अतुल गायकवाड, यतिन भोसले, गोपाल मदने विष्णु सुतार, अमोल गायकवाड, संदिप साळवे, यांनी केलेली आहे.

Post a Comment

0 Comments